शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लॉकडाऊनच्या पार्श्वभूूमीवर भरारी पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST

या पथकांनी गुरुवारपर्यंत ५५ प्रकरणात ९ एफआयआर नोंदवून साडेतीन लाखांची दंडवसुली केली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण १२ प्रकरणात कारवाई करून ५ हजार ६०० रुपयांचा दंड केला आहे. कोविड १९ विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निगरानी पथकाने कलम १८८ व साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ अंतर्गत ५५ प्रकरणांत ९ एफआयआर नोंदवून साडेतीन लाखांचा दंड वसूल केला आहे.

ठळक मुद्देशासन निर्देश अवहेलनेची ५५ प्रकरणे : ९ एफआयआर, साडेतीन लाखाची दंड वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाहा/आर्वी : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. घराबाहेर पडू नका, घरीच राहा , आरोग्याची काळजी घ्या, असे वारंवार शासनाने आवाहन करूनही नागरिक ऐकत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. मास्क लावत नाही. गर्दी करतात. एवढेच नव्हे, तर लॉकडाऊन असूनही व्यावसायिक दुकाने उघडतात. निर्देशाचे पालन करीत नसल्याने यावर कडक उपाययोजना करून आळा घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी भरारी, निगराणी पथके तयार केली.या पथकांनी गुरुवारपर्यंत ५५ प्रकरणात ९ एफआयआर नोंदवून साडेतीन लाखांची दंडवसुली केली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण १२ प्रकरणात कारवाई करून ५ हजार ६०० रुपयांचा दंड केला आहे.कोविड १९ विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निगरानी पथकाने कलम १८८ व साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ अंतर्गत ५५ प्रकरणांत ९ एफआयआर नोंदवून साडेतीन लाखांचा दंड वसूल केला आहे. तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी राजापूर बाजारवाडा मिर्झापूर, मायबाई वॉर्ड या परिसरात भेटी देऊन तपासणी केली असता दहा प्रकरणांत १७ हजार ५८० रुपयांचा दंड ठोठवून वसुली केली.नायब तहसीलदार विनायक मगर यांच्या पथकाने कलम १८८, २६९ साथरोग अधिनियम १८९७ कलम ३ अन्वये, एक, एफआयआर नोंदविली, तीन प्रकरणांत ५७ हजार २०० रुपयांचा दंड तर एका प्रकरणात दोन लाखाचा दंड आकारला. जाम, चांदणी, हरदोली या परिसरात भेट देऊन तपासणी केली.नायब तहसीलदार व्ही. पी. हूड यांनी वाढोणा परिसरात तपासणी करून एका प्रकरणात २ हजाराचा दंड केला तर एकूण चार प्रकरणात ५४ हजार २०० रुपयाची दंडवसुली केली. विस्तार अधिकारी शेंडे यांनी खरांगणा परिसरातील पाच प्रकरणात २ हजार ५०० रुपयांचा दंड केला. एकूण सोळा प्रकरणात ८ हजारांची दंड वसुली केली. आर्वी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विद्याधर अंधारे यांनी पाच प्रकरणात ९०० रुपये दंड तर कलम १८८, २६९ साथरोग अधिनियम १८९७ कलम ३ नुसार ८ एफआयआर आणि १३ प्रकरणात २ हजार ३४० रुपयांची दंड वसुली केली.कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर घरात राहा आणि बाहेर पडणे गरजेचे असेल तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे सांगितले जात आहे. मात्र, अनेक भागात प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी, दंडात्मक कारवाईला सुरवात करण्यात आली आहे.- विद्यासागर चव्हाण, तहसीलदार, आर्वी.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार