वर्धा जिल्ह्यात अपहरण करुन ७ वर्षीय चिमुरडीवर सामुहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 07:33 PM2020-08-08T19:33:48+5:302020-08-08T19:34:29+5:30

सात वर्षीय चिमुरडीचे घरातून अपहरण करुन एका निर्जनस्थळी नेत तिघांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी घडली.

Mass abduction of 7 year old girl in Wardha district | वर्धा जिल्ह्यात अपहरण करुन ७ वर्षीय चिमुरडीवर सामुहिक अत्याचार

वर्धा जिल्ह्यात अपहरण करुन ७ वर्षीय चिमुरडीवर सामुहिक अत्याचार

Next
ठळक मुद्देएक आरोपी गजाआड


लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: सात वर्षीय चिमुरडीचे घरातून अपहरण करुन एका निर्जनस्थळी नेत तिघांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. तब्बल दोन दिवसांनंतर हे प्रकरण उघडकीस आल्याने अखेर पुलगाव पोलिसात तीन नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

पुलगाव पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, इंझाळा येथील विनोद वरभे याचे पीडितेच्या घरी नेहमी येणेजाणे होते. पीडितेच्या कुटुंबियाशी परिचय असल्याने त्याला घरातील सर्व सदस्य ओळखत होते. ६ ऑगस्ट रोजी पीडित चिमुरडी आपल्या आई वडिलांसह घरी झोपून असताना विनोद वरभे याने पीडितेच्या घरात प्रवेश करीत तिचे अपहरण केले. तिचे तोंड दाबून तिला लगतच्या एका नर्सरीत नेत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. इतकेच नव्हे तर त्याच्यासोबत असलेल्या दोघांनीही तिच्यावर अत्याचार केला. गंभीर अवस्थेत पीडितेला तिच्या घरासमोर फेकून देण्यात आले. पीडितेला काहीही समजत नव्हते तिला त्रास होवू लागल्याने ती रडत बसली होती.

पीडितेच्या आईला रडण्याचा आवाज आल्याने बाहेर येऊन पाहिले असता गंभीर अवस्थेत मुलगी दिसून आल्याने आईच्या पाया खालची वाळूच सरकली. बदनामी खातर ही बाब पीडितेच्या आईने कुणालाही सांगितली नाही. एका सामाजिक संस्थेला याची माहिती मिळाली असता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पीडितेच्या घरी जात पीडितेचे व तिच्या कुटुंबाचे समुपदेशन केले. अखेर पीडितेने तक्रार देण्याचे ठरवले. त्यानुसार शनिवारी पीडितेने पुलगाव ठाण्यात अत्याचाराची तक्रार दाखल केली असून तक्रारीत तिघांनी अत्याचार केल्याचे बयाण दिल्याने पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. विनोद वरभे यास अटक केली असून अन्य दोघांचा शोध पुलगाव पोलीस घेत आहे.

Web Title: Mass abduction of 7 year old girl in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.