शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST

जेएनयूचे विद्यार्थी जवळपास दोन महिन्यांपासून फी वाढीच्या विरोधात लोकशाही पद्धती संघर्ष करित आहेत. मात्र, त्यांच्यावर काही बाहेरील गुंडांनी मुखवटा घालून भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी, संशोधनकर्ते आणि प्राध्यापकांना गंभीर दुखापत झाली. एकीकडे गुंड विद्यापीठ परिसरात घुसून हल्ला करतात तर दुसरीकडे प्रशासन शांत दिसत आहे. त्यामुळे हा हल्ला नियोजित असल्याचा आरोपही यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आला.

ठळक मुद्देजेएनयुमधील हल्ल्याचा निषेध : कठोर कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जेएनयूमधील विद्यार्थी आणि संशोधकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात ३५ पेक्षा जास्त विद्यार्थी व संशोधनकर्ते जखमी झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि जेएनयुमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ येथील हिंदी विश्व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात मोर्चा काढला. जोरदार घोषणाबाजी करीत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.जेएनयूचे विद्यार्थी जवळपास दोन महिन्यांपासून फी वाढीच्या विरोधात लोकशाही पद्धती संघर्ष करित आहेत. मात्र, त्यांच्यावर काही बाहेरील गुंडांनी मुखवटा घालून भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी, संशोधनकर्ते आणि प्राध्यापकांना गंभीर दुखापत झाली. एकीकडे गुंड विद्यापीठ परिसरात घुसून हल्ला करतात तर दुसरीकडे प्रशासन शांत दिसत आहे. त्यामुळे हा हल्ला नियोजित असल्याचा आरोपही यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ गांधी विद्यापीठातील विद्यार्थी आणि हिंदी विद्यापीठाच्या संशोधकांनी हिंदी विश्व विद्यापीठाच्या मुख्यव्दारापर्यंत मोर्चा काढला. या दरम्यान उपस्थितांनी केंद्र सरकार शैक्षणिक संस्था उद्धवस्त करुन खाजगीकरणावर जोर देत आहे. जामिया मिलिया, एएमयू आणि जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर हल्ले करुन बदनामी करण्याचा प्रयत्न बऱ्याच काळापासून चालू आहे. यावेळी विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणारे चंदन सरोज, रविचंद्र, अजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार इस्तेखार अहमद यांनी मानले. या मोर्चादरम्यान विद्यापीठ परिसरात विद्यार्थी व संशोधनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चामध्ये विश्व हिंदी विद्यापीठातील विद्यार्थी व संशोधनकर्ते मोठ्या संख्येने सहभगी होते. या मोर्चादरम्यान हिंदी विश्व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन त्याव्दारे या घटनेचा निषेध केला. व हल्लेखोरांवर कारवार्इंची मागणी केली.सेवाग्राम आश्रमाबाहेर सर्व सेवा संघ करणार ३० ला सत्याग्रहसेवाग्राम- जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात ५ जानेवारीला शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर ५० जणांनी प्राणघातक हल्ला केला. यात विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा आय.सी.घोष गंभीर जखमी झाल्या. हल्लेखोर लाठी,रॉड घेऊन विद्यापीठ परिसरात शिरले त्यांनी तीन तास गोंधळ घातला. याची माहिती पोलिसांना दिल्यावरही पोलीस वेळेवर पोहोचली नसल्याने यामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. या घटनेचा निषेध म्हणून अखिल भारतीय सर्व सेवा संघांचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी महात्मा गांधीजींच्या शहिद दिनी ३० जानेवारीला सेवाग्राम आश्रम समोर उपवास सत्याग्रह करणार असल्याचे जाहीर केले आहे. हल्याच्या अगोदर व्हॉट्स अ‍ॅपवरील मेसेज मध्ये वी.सी.आपला माणूस असल्याचे म्हटले. यावरून हल्ला सुनियोजित असल्याचे स्पष्ट होते. ज्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मान्य नाही, अशांचा या हल्ल्यात हात आहे. या लोकांची कार्यपद्धती फासिवाद आहे. यातून अनेकांना हिटलर व मुसोलिनी पासून प्रेरणा मिळते. अशाच विचांराच्या लोकांनी गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली.गांधी विचार यामुळे संपेल असा समज होता. पण गांधी विचार मात्र सर्वत्र पसरत असल्याचे सांगून हिंसाचाराचा तेच आश्रय घेतात ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. या हिंसाचारात तेच लोकं सहभागी आहेत असेही विद्रोही यांनी पत्रकातून म्हटले आहे. सर्व सेवा संघाने या घटनेचा विरोध, नागरिकता संशोधन, एन.आर.सी.आणि एन.पी.आर.चा विरोध करण्यासाठी बापूंच्या बलिदानदिनी सकाळपासून सायंकाळी ५.१७ वाजतापर्यंत उपवास करणार आहे. त्यानंतर सर्व धर्म प्रार्थनेने या सत्याग्रहाचा समारोप होणार आहे.

टॅग्स :hindiहिंदीuniversityविद्यापीठ