शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अनेक एस.टी. चालक-वाहकाची रात्र निघते मंदिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 11:02 IST

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मुक्कामी रापमची बस जात असली तरी बहुतांश ठिकाणी चालक व वाहकांना विश्राम करण्यासाठी सुविधाच नसल्याने त्यांची रात्र अनेकदा मंदिरात किंवा वाहनातच निघते. रापमच्या कर्मचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.

ठळक मुद्देरापमच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज

आॅनलाईन लोकमतवर्धा: प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मुक्कामी रापमची बस जात असली तरी बहुतांश ठिकाणी चालक व वाहकांना विश्राम करण्यासाठी सुविधाच नसल्याने त्यांची रात्र अनेकदा मंदिरात किंवा वाहनातच निघते. रापमच्या कर्मचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.तालुक्यातील अनेक गावांमधील मुक्कामाच्या ठिकाणी एसटी चालक व वाहकासाठी राहण्याची साधी सुविधा नाही. त्यांना मंदिर अथवा बसमध्येच रात्र काढावी लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवाशी घेऊन ते पुढील प्रवासाकरिता निघतात. इतरांना सुविधा देताना ते मात्र असुविधेचा सामना करीत असल्याचे वास्तव आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये बसच्या वाहक व चालकाला रात्र काढण्याकरिता सुविधा नसल्याने त्यांना गावांमधील धार्मिक स्थळे, गावातील बसथांबे किंवा ग्रा.पं. कार्यालयांचा आधार घ्यावा लागतो. बऱ्याचदा वाहक व चालकांजवळ जेवणाचा डबा सोबत राहत नसल्याने मिळेल ते खाद्यपदार्थ सेवन करून त्यांना नागरिकांना सुविधा द्यावी लागते. त्यांच्यासाठी बहूतांश ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रात्री अनेक गावखेड्यात मुक्कामी जाणाऱ्या वाहक व चालकांना सांगल्या सोई-सुविधा देण्यासाठी रापमच्या वरिष्ठ अधिकाºयांनी योग्य पाऊल उचलत त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाstate transportराज्य परीवहन महामंडळ