शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

पीक जगविण्यासाठी अनेक प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 11:37 PM

सध्या पावसाने दडी मारली आहे. यात शेतातील अंकुरे करपण्याच्या मार्गावर आली आहे. जर येत्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली तरच शेतातील पिके वाचू शकतील अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसिंचनाकडे शेतकऱ्यांची धाव : भारनियमनाने असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सध्या पावसाने दडी मारली आहे. यात शेतातील अंकुरे करपण्याच्या मार्गावर आली आहे. जर येत्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली तरच शेतातील पिके वाचू शकतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांकडून शेतात उगविलेले अंकूर वाचिण्याकरिता सध्या अनेक प्रयोग केले जात आहे. कुठे फवाऱ्याच्या माध्यमातून अंकुरलेल्या पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न होत आहे. तर कुठे मजुरांच्या सहायाने या अंकुरांना पाणी देत जगविण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे.हिंगणघाट परिसरात गज आठ दिवसांत मोठ्या प्रमाणावर कपाशी लावण झाली. या भाग जवळपास ५० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. आठ दहा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकºयांनी कापूस व सोयाबीनची पेरणी उकून घेतली. अशा पावसाचा पुढे फायदा होईल अशा आशेने मोठ्या प्रमाणात अर्थात ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. काही सोयाबीनला अंकुरही फुटले, रोपटे बाहेर आले. परंतु आता पाऊस नसल्याने वातावरण तापत आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रोपट्यांच्या वाढीवर परिणाम होत आहे. ज्यांच्या सोयाबीनचे बी-बियाणे अद्याप रोपट्यात रुपांतरीत व्हायचे आहेत त्यांचे बियाणे ही जमिनीत कोरडपणाने गुदमरून मरत आहे. शेतकरी आपले डोळे आभाळाकडे लावून बसले असून पावसाची प्रतीक्षा कायम आहे.कापसाचे बियाणे लावल्यानंतर अचानकपणे उष्णतेत वाढ झाली आणि दमटपणा वाढला. दोन तीन दिवसात पावसाचे पुनरागमन झाल्यास दुबार पेरणीची परस्थिती टळेल. अन्यथा आर्थिक शेतकºयांना दुबार पेरणीच्या आर्थिक फटक्याची शक्यता आहे.बळीराजाला निसर्गाचा पहिला झटकानिसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरडवाहू शेतकरी आभाळाकडे डोके लावून बसले आहे. पावसाचे पुनरागमन सोडा एक थेंबही पडेल असे चित्र सध्या नसल्याचे दिसत आहे.पावसाची सुरुवात निर्धारीत वेळेआधी होणार असा अंदाज खरा ठरल्यानंतर पावसाने गत आठवड्यापुर्वी गर्जनेसह आगमन झाले. कुठे कुठे जबरदस्त पाऊसही झाला. यामुळे शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या. परंतु आता त्या करपण्याच्या मार्गावर आहे.शेतकरी मजुरांकडून पिकांना पाणीनारायणपूर परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी मजुरांच्या हाताने कपाशी पिकाला पाणी देत आहे. या माध्यमातून त्यांचा अंकुरलेली पिके जगविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले आहे. असा प्रयत्न करणे शेतकºयांकरिता आर्थिक अडचणीचे ठरत आहे.

टॅग्स :agricultureशेती