शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा शहरासह लगतच्या नऊ ग्रा.पं.परिसरात सक्तीची संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 18:11 IST

उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी वर्धा शहरासह वर्धा शहराशेजारील नऊ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात सक्तीच्या संचारबंदीचा आदेश निर्गमित केला आहे. या आदेशाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकूण १२ चमू विशेष प्रयत्न करणार असून विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्देविनाकारण फिरणाऱ्यास होणार दंड१२ चमू करणार प्रभावी अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: पिपरी (मेघे) येथील नवविवाहित तरुणाच्या निकट संपर्कातील व्यक्तींपैकी चार व्यक्तींचे कोरोना अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी वर्धा शहरासह वर्धा शहराशेजारील नऊ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात सक्तीच्या संचारबंदीचा आदेश निर्गमित केला आहे. या आदेशाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकूण १२ चमू विशेष प्रयत्न करणार असून विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

वर्धा उपविभागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वर्धा शहर आणि शहराला लागून असलेल्या नऊ ग्रामपंचायतमध्ये शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून सोमवार १३ जुलै रात्री ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शिवाय वर्धा शहरासह शहराशेजारील रहिवासी असलेल्या नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन उपविभागीय न्याय दंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे. संचार बंदीच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सेवाग्राम, सावंगी (मेघे), रामनगर, वर्धा शहर या चार पोलीस स्टेशन मधील ठाणेदारांच्या नेतृत्त्वातील प्रत्येकी एक चमू, गटविकास अधिकारी स्वाती इसाये यांच्या नेतृत्त्वातील दोन चमू, महसूल विभागाच्या तीन चमू तसेच वर्धा नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांच्या नेतृत्त्वातील तीन चमू विशेष प्रयत्न करणार आहेत.मोजकीच सेवा राहणार सुरूउपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांच्या आदेशानुसार बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे), सिंदी (मेघे), नालवाडी, आलोडी, म्हसाळा, साटोडा, पिपरी (मेघे), उमरी (मेघे) या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पुढील तीन दिवस केवळ औषधी दुकाने, दवाखाने, दूध, वर्तमान पत्र वाटप, अत्यावश्यक शासकीय कार्यालय सुरू राहणार आहेत.सध्याच्या कोरोना संकटात यापूर्वी वर्धेकरांनी जिल्हा प्रशासनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून १३ जुलैपर्यंत वर्धा शहरासह शहराशेजारील नऊ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रासाठी सक्तीच्या संचारबंदीचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. स्वत: कोरोनामुक्त राहण्यासाठी पुढील तीन दिवस नागरिकांनी घरातच रहावे. तसेच जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.- सुरेश बगळे, उपविभागीय महसूल अधिकारी वर्धा.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस