शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

तृतीयपंथीशी लग्नाचा तगादा, नकार देताच केला चाकूने हल्ला; वर्ध्यातील घटना

By चैतन्य जोशी | Updated: September 29, 2022 17:22 IST

आरोपीस अटक

वर्धा : मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तु मला आवडते, त्याने तृतीयपंथीकडे असा तगादा लावला. तृतीयपंथीने समजून घालत नकार दिला असता, संतापलेल्या विकृताने जवळील चाकू काढून तृतीयपंथीच्या हातावर वार करीत जखमी केले.

ही धक्कादायक घटना स्वावलंबी मैदानावर दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी २८ रोजी रामनगर पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्याची माहिती दिली. मंगेश उर्फ बालु मनोहर सौरंगपते रा. केळकरवाडी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

३३ वर्षीय तृतीयपंथी ही स्वावलंबी मैदानातून तिच्या घरी जात असताना आरोपी मंगेश उर्फ बालू हा रस्त्यात भेटला दोघेही एकमेकासोबत बोलत असतानाच आरोपी बालूने तृतीयपंथीला तु माझ्याशी लग्न कर असा तगादा लावला. तृतीयपंथीने त्याची समजूत काढून तुला दोन मुलं आहे पत्नी आहे, मी तुझ्याशी लग्न करु शकत नाही, असे म्हटले. यावेळी रागाच्या भारात बालूने जवळील चाकू काढून तृतीयपंथीच्या हातावर व पायावर वार करीत जखमी केले. तृतीयपंथीने तेथून पळ काढून आडोशाला जाऊन लपली. काही वेळाने तृतीयपंथीने रामनार पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आरोपी मंगेश उर्फ बालू सौरंगपते यास अटक केल्याची माहिती दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा