शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळिमा! नराधम पित्याकडून पोटच्या १२ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 18:09 IST

पीडित मुलीने आरडाओरड केली असता परिसरातील महिला व तिच्या भावंडांनी धाव घेतल्याने आरोपी आरजू खंडाळकर याने तेथून पळ काढला.

ठळक मुद्देतरोडा येथील घटनेने खळबळ, विकृत आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वर्धा : भावंडांना जबरदस्तीने घराबाहेर काढून अवघ्या १२ वर्षीय मुलीचे शोषण करून अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक अन् लाजिरवाणी घटना तरोडा गावात घडली. या प्रकरणात हिंगणघाट पोलिसांनी तत्काळ दखल घेत विकृत आरोपीला बेड्या ठोकून पोलिसी हिसका दाखवला.

१२ वर्षीय मुलगी तिच्या भावंडांसोबत घरी खेळत होती. दरम्यान, आरोपी आरजू राजू खंडाळकर रा. तरोडा हा घरी आला आणि मुलीला पिण्यास पाणी मागितले. मुलगी पाणी आणण्यास जाताच आरोपी आरजूने घरात शिरून खेळत असलेल्या तिच्या भावंडांना जबरदस्तीने घराबाहेर काढून दिले आणि मुलीला प्रसाधनगृहाकडे खेचत नेत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने आरडाओरड केली असता परिसरातील महिला व तिच्या भावंडांनी धाव घेतल्याने आरोपी आरजू खंडाळकर याने तेथून पळ काढला. घाबरलेल्या मुलीने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. आईने मुलीला सोबत घेत थेट हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली.

पोलिसांनी तक्रारीचे गांभीर्य पाहून तत्काळ तपासचक्र फिरवून विकृत आरोपी आरजूला अटक करून बेड्या ठोकल्या. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी भेट देत पाहणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक के.एम. पुंडकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक धनश्री कुटेमाटे, पोलीस उपनिरीक्षक पपीन रामटेके करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगwardha-acवर्धा