शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे शोषण करीत केले गर्भवती; वर्ध्यातील घटनेने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 17:25 IST

१७ वर्षीय पीडिता ही समुद्रपूर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून ती मागील काही वर्षांपासून वर्ध्यात शिक्षणासाठी किरायाच्या खोलीत राहते.

ठळक मुद्देआरोपीस ठोकल्या बेड्या

चैतन्य जोशी 

वर्धा : मित्राच्या शेतात नेत अल्पवयीन मुलीचे बळजबरी शोषण करुन तिला गर्भवती बनविल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली. याप्रकरणी १५ रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी नराधम आरोपीस बेड्या ठोकल्याची माहिती दिली. ऋतीक उर्फ सुदर्शन गंगाधर वाडेकर (२०) रा. साबळे प्लॉट वर्धा. असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

१७ वर्षीय पीडिता ही समुद्रपूर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून ती मागील काही वर्षांपासून वर्ध्यात शिक्षणासाठी किरायाच्या खोलीत राहते. तिची ओळख आरोपी ऋतीक वाडेकर याच्याशी स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानात झाली होती. त्यानंतर दोघांत मैत्री झाली. जुलै २०२१ मध्ये देखील पीडिता आरोपी ऋतीकसोबत भेटली होती. जानेवारी २०२२ मध्ये ऋतीकने पीडितेला फोन करुन तिला भेटण्यासाठी गेला. दोघेही दुचाकीवर बसून वर्धा ते देवळी रस्त्याने फिरायला गेले. दरम्यान आरोपी ऋतीकने पीडितेला मित्राच्या शेतात नेत पीडितेचे बळजबरी शोषण केले.

फेब्रुवारी महिन्यातही असाच प्रकार त्याने पुन्हा केला. महाविद्यालयाला सुट्ट्या लागल्याने पीडिता तिच्या मुळ गावी गेली असता तिची प्रकृती बिघडली. पीडितेने सिंदी रेल्वे येथील रुग्णालयात जात तपासणी केली असता पीडिता ही सहा महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. १४ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पीडितेला सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून पीडितेवर सध्या सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

पीडितेने याबाबतची तक्रार शहर पोलिसांत दिली असून पोलिसांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत आरोपी ऋतीक उर्फ सुदर्शन गंगाधर वाडेकर याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धाMolestationविनयभंग