शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
2
ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
3
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
4
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
5
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
6
पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू
7
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
8
'चला हवा येऊ द्या' परत येणार? खुद्द श्रेया बुगडेनेच दिली मोठी हिंट, गौरव मोरेही दिसणार
9
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
10
पावसाचं थैमान! गाझियाबादमध्ये एसीपी ऑफिसचं छत कोसळलं, ढिगाऱ्याखाली अडकल्याने सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
11
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
12
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
13
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
14
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
15
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
16
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
17
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
18
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
19
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
20
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण

आगरगावात घरांसह शाळेचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST

रविवारी सायकांळी सातच्या सुमारास देवळी तालुक्यातील आगरगाव, पिपरी (ख), लोणी, फत्तेपूर व नागझरी यासह काही भागांत वादळी वाºयासह पावसाने चांगलीच हजेरी लावली. आगरगाव परिसरातील गावांमध्ये वादळी पावसाने अनेकांच्या घरांचे व यशवंत विद्यालयाच्या इमारतीचे नुकसान केले.

ठळक मुद्देटिनपत्रे उडाले : परिसरातील अनेक गावांत पावसाची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कआगरगाव : उकाड्याने हैराण झालेल्या आगरगावकरांना रविवारी काहीसा दिलासा मिळाला; मात्र रविवारी सांयकाळी सातच्या सुमारास गावासह परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे घरांसह शाळेचे नुकसान झाले.मागील तीन ते चार दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली होती. एवढेच नव्हे, तर सकाळी गारवा, दुपारी प्रखर उष्णतामान आणि रात्री पाऊस असा काहीसा बदल जिल्ह्यातील काही गावांनी अनुभवला. मात्र रविवारी सायकांळी सातच्या सुमारास देवळी तालुक्यातील आगरगाव, पिपरी (ख), लोणी, फत्तेपूर व नागझरी यासह काही भागांत वादळी वाºयासह पावसाने चांगलीच हजेरी लावली. आगरगाव परिसरातील गावांमध्ये वादळी पावसाने अनेकांच्या घरांचे व यशवंत विद्यालयाच्या इमारतीचे नुकसान केले.रविवारी सांयकाळी सहा वाजल्यापासूनच गावासह परिसरात जोरदार वारे वाहू लागले होते. त्यामुळे पाऊस येणार असा अंदाज बांधला होता. तो खरा ठरला.आर्वीसह तालुक्याला वादळी पावसाचा तडाखाआर्वी : रविवारी रात्री आर्वीसह तालुक्यातील गावांना वादळी वाºयासह पावसाने तडाखा दिला. दरम्यान अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने गावकऱ्यांना अंधारातच रात्र काढावी लागली. आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी, जळगाव, शिरपूर, टाकरखेडा, देऊरवाडा, टोणा, लाडेगाव, सर्कसपूर, राजापूर, निंबोली (शेंडे), अहिरवाडा, वाठोडा, वागदा, खुबगाव, नांदपूर, पाचेगाव, दहेगाव (म.), पिंपळखुटा, गुमगाव, चिंचोली (डांगे), वाढोणा, बेढोणा, सावळापूर, धनोडी, मांडला आदी गावात वादळीवाऱ्याने चांगलेच थैमान घातले. तालुक्यातील निंबोली येथील शेतातील गोठा, झाडे उन्मळून पडली तर अनेक शेतकऱ्याच्या शेतातील साहित्य वादळी वाऱ्याने उडून गेले. आर्वीतील काही वॉर्डात वादळी पावसाने झाडे पडली. रात्री उशिरापर्यंत तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच होती.रोहणा परिसरात शेतकऱ्यांची दाणादाणरोहणा : परिसरात रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान आकाशात एकदम काळे ढग दाटून आले आणि वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडलीत तर शेतातील गोठ्यांची पडझड झाली. वादळी पावसाने मोठे नुकसान झाले नसले तरी दर दोन-तीन दिवसांनी येणाऱ्या वादळी पावसाने जमीन कशी तापेल, ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. गोपालकांची वादळीवारा, पाऊस व विजांपासून जनावरांचे रक्षण करताना दाणादाण होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस