शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यातील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेला मिळाली कोरोना चाचणीची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 14:55 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोना चाचणी प्रयोगशाळेची संख्या वाढविण्यात येत आहे. विदर्भातनागपूर, अकोलानंतर आता वर्ध्यातील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेला कोरोना चाचणीची परवानगी नागपूर येथील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमार्फत मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोना चाचणी प्रयोगशाळेची संख्या वाढविण्यात येत आहे. विदर्भातनागपूर, अकोलानंतर आता वर्ध्यातील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेला कोरोना चाचणीची परवानगी नागपूर येथील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमार्फत मिळाली आहे. यामुळे वर्धा जिल्ह्यातील सर्व कोरोना चाचणी येथेच करता येतील. ही वर्धा जिल्ह्यासाठी आनंददायक बातमी आहे.वर्ध्यातील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था सेवाग्राम यांनी 16 मार्चला कोरोना चाचणी परवानगी मिळण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडे प्रस्ताव पाठवला होता. त्याअनुषंगाने भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेच्या संचालक आणि नागपूर एम्स च्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापक यांनी सेवाग्राम महाविद्यालयातील आवश्यक सुविधांची ऑनलाईन तपासणी केली. चाचणीसाठी मान्यताप्राप्त उपकरणे ,आवश्यक कागदपत्रे , भौतिक सुविधा, प्रशिक्षित डॉक्टर, कर्मचारी वर्ग याच्या तापसणीसोबतच त्यांना चाचणी साठी स्त्राव नमुना पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या मानांकणाप्रमाणे 100 टक्के जुळल्यानंतर सेवाग्राम आयुर्विज्ञान संस्था कोरोना चाचणी करण्यासाठी योग्य असल्याचा अहवाल दिला.आज महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता नितीन गंगणे यांना नागपूर एम्स कडून कोरोना चाचणीसाठी परवानगी मिळाल्याचे पत्र प्राप्त होताच त्यांनी जिल्हाधिकारी यांना कळवले.यावेळीं गंगणे म्हणाले, आयुर्विज्ञान संस्थेतील एक सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि तीन तंत्रज्ञ यांचे एम्स येथे चाचणीसंदर्•ाात प्रशक्षण झाले आहे. महाविद्यालयात पूर्वीच बीएसएल - 3 प्रयोगशाळा आहे. पूर्वी ही प्रयोगशाळा क्षयरोग कल्चर चाचणीसाठी वापरली जात होती. आता ती कोरोना चाचणी प्रयोगशाळेत रूपांतरित केली आहे. प्रयोगशाळेत उणे 20,आणि 80 तापमानावर यासंदर्भात टेस्टिंग एजंट ठेवण्याची सुविधा आहे. कोरोना चाचणी आम्ही नागपूर एम्स च्या मार्गदर्शनाखाली करणार असून यासाठी टेस्टिंग किट भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेमार्फत पुरविण्यात येणार आहे. या मान्यतेमुळे आमच्या संस्थेतील सुविधा उच्च दर्जाच्या असल्याची ही पोचपावती मिळाली आहे अशी प्रतिक्रिया नितीन गंगणे यांनी व्यक्त केली.तपासणीची सुविधा वर्धेतच उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण कार्य करता येईल. 1150 चमू तयार केल्या आहेत. या चमू घरोघरी जाऊन नागरिकांना ताप ,सर्दी ,खोकला, श्वास घ्यायला त्रास आदी लक्षणांबाबत माहिती घेणार आहेत. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय प्रथमिक आरोग्य केंद्रात फिव्हर क्लीनिकची सुविधा केली आहे. तिथे येणाऱ्या तापाच्या रुग्णांचे स्त्राव आता टेस्टिंगसाठी पाठवता येतील. कुणी संशयित वाटत असेल तर त्याची चाचणी वर्धेतच होणार असल्यामुळे अहवाल लवकर प्राप्त होऊन उपचार करणे सोयीचे होणार आहे. वर्धा जिल्ह्याला या परवानगीमुळे मोठा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस