शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

 Maharashtra Gram Panchayat Election Results; वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात महाविकास आघाडीची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 16:31 IST

 Maharashtra Gram Panchayat Election Results वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील बोरगाव-आलोडा, कवठा रेल्वे व आकोली या तीन ग्रा.पं.च्या निवडणूक निकालात महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले.

ठळक मुद्देकाँग्रेस-राष्ट्रवादीला दोन तर भाजपला एक जागा

 लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा:  वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील बोरगाव-आलोडा, कवठा रेल्वे व आकोली या तीन ग्रा.पं.च्या निवडणूक निकालात महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले. यापैकी बोरगाव आलोडा व कवठा (रेल्वे) या दोन ग्रा.पं.काँग्रेस व राष्ट्रवादीला तसेच आकोलीची ग्रा.पं. भाजपाच्या वाट्याला आली. या तीनही ग्रा.पं.च्या मतदारांनी मागील सत्ता नाकारून नव्यांना संधी दिली. विशेष म्हणजे आकोली ग्रा.पं. मध्ये सेनेचा कोणताही उमेदवार रिंगणात नसताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची या ठिकाणी प्रचार वारी झाली. आयोजित भाषणात त्यांनी भाजपावर टीका करून सेना उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. परंतु येथे सेनेचे उमेदवार रिंगणात नसल्याचे काहींनी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी कपाळावरच हात मारून घेतल्याची चर्चा होत आहे.

गावात मंत्र्याची सभा होऊनसुद्धा भाजप सत्तेत आल्याची टीका होत आहे. बोरगाव आलोडा ग्रा.पं. मध्ये राष्ट्रवादीच्या प्रशांत निमसडकर गटाने ९ पैकी ७ जागांवर विजय मिळविला. दोन जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या. या ग्रा.पं. मध्ये गणेश मानकर, सविता राजू कापटे, सारिका गजानन भोयर, अमित दोड, माधुरी नीतेश डोंगरे, पूजा रवींद्र खेवले, अमोल निमसडकर, प्रतीक सोयाम व शालिनी प्रशांत निमसडकर हे उमेदवार विजयी झाले. कवठा रेल्वेच्या ९ सदस्यीय ग्रा.पं. मध्ये काँग्रेसच्या जय महल्ले गटाने ५ जागा मिळवून बहुमत प्राप्त केले. भाजपा व इतर पक्षांच्या उमेदवारांना चार जागा मिळाल्या. या ग्रा.पं. मध्ये अक्षय गणवीर, शुभांगी अनिल कांबळे, कामिनी बापू काळे, अंकुश मडावी, सुवर्णा विनोद मून, सुवर्णा अशोक राऊत, संदीप डोंगरे, सौरभ डहाके आणि दीपमाला संतोष नेहारे हे उमेदवार विजयी झाले. आकोली-दुरगडाच्या सात सदस्यीय गट ग्रा.पं. मध्ये भाजपाच्या राजेश बकाने गटाने पाच जागा जिंकून बहुमत मिळविले. काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. या ग्रा.पं. मध्ये रवी बोडे, संजय बोडे, अर्चना गजानन बकाले, संगीता विलास ताजने, उमेश मून व साधना नरेश पाटील आदी उमेदवार विजयी झाले.

टॅग्स :Electionनिवडणूक