Maharashtra Election 2019 : शेतकरी अन् व्यावसायिक साथ-साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 05:00 AM2019-10-15T05:00:00+5:302019-10-15T05:00:39+5:30

शेतीला व्यवसायाची किंवा नोकरीची जोड असल्याशिवाय संपन्नता येऊ शकत नाही; हेही सत्य अनेकांनी स्वीकारले आहे. म्हणून यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघातून शेती करणारे आणि व्यवसाय करणाºया उमेदवारांची संख्या सर्वाधिक आणि सारखीच असल्याचे दिसून येत आहे.

Maharashtra Election 2019 : Farmers and business side by side | Maharashtra Election 2019 : शेतकरी अन् व्यावसायिक साथ-साथ

Maharashtra Election 2019 : शेतकरी अन् व्यावसायिक साथ-साथ

googlenewsNext
ठळक मुद्देस्वातंत्र्य सैनिकही रिंगणात : अर्धेअधिक उमेदवार व्यावसायिक व शेतकरी, नोकरदार; गृहिणींची पाठ

आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सरकारे येतात आणि जातात; परंतु शेतकऱ्यांच्या समस्या काही केल्या सुटता सुटत नाहीत. त्यामुळे शेतीशी नाळ जुळलेला आणि शेती व्यवसायाची माहिती असलेलाच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकेल, असे मतदारांकडून बोलले जाते. पण, शेतीला व्यवसायाची किंवा नोकरीची जोड असल्याशिवाय संपन्नता येऊ शकत नाही; हेही सत्य अनेकांनी स्वीकारले आहे. म्हणून यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघातून शेती करणारे आणि व्यवसाय करणाºया उमेदवारांची संख्या सर्वाधिक आणि सारखीच असल्याचे दिसून येत आहे. यावरून सर्वच राजकीय पक्षांनी व्यावसायिक आणि शेती असलेल्या परंपरागत उमेदवारांनाच उमेदवारी दिल्याने नोकरदार व गृहिणींनी याकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट होते. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणूनही फारसा उत्साह दाखविला नसल्याचे चित्र आहे.
वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा, आर्वी, हिंगणघाट व देवळी असे चार विधानसभा मतदारसंघ असून या चारही मतदारसंघातूून ४७ उमेदवार रिंगणात आहेत.
या सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रावरून त्यांच्या व्यवसायाचा तपशील उपलब्ध झाला आहे. त्यानुसार निवडणूक रिंगणात असलेल्या ४७ उमेदवारांपैकी ३१.९१ टक्के उमेदवारांनी आपल्या उत्पन्नाचे साधन व्यवसाय व ३१.९१ टक्के उमेदवारांनी शेती दाखविले आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात शेती आणि व्यवसाय करणाºया उमेदवारांचे प्रमाण समान असल्याचे निदर्शनास आले आहे.
तसेच वकील, पेन्शनर व नोकरी करणाºयांची प्रत्येकी टक्केवारी ही ६.३८ इतकी दर्शविली आहे. त्या खालोखाल शिक्षक आणि मजुरी करणाºयांची प्रत्येकी टक्केवारी ही ४.२५ इतकी असून २.१२ टक्के उमेदवार हे काहीच करीत नसल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. विशेषत: देवळी विधानसभा मतदारसंघातील एक स्वातंत्र्य सैनिकही या निवडणूक रिंगणात उभा ठाकला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या रणसंग्रामात काही प्रमाणात का होईना पण, सर्वसमावेशक उमेदवार आपले भविष्य अजमावत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

विधानसभा मतदारसंघानिहाय उमेदवारांचे ‘प्रोफाईल’
वर्धा मतदारसंघ
च्या मतदारसंघातील दहा उमेदवारांपैकी चार उमेदवारांचा व्यवसाय आहे. पाच उमेदवार शेतकरी असून एक उमेदवार हे वकील आहेत.

आर्वी मतदारसंघ
च्या मतदारसंघातील दहा उमेदवारांपैकी तीन उमेदवार व्यवसाय करतात. तसेच तीन उमेदवार शेतकरी असून प्रत्येकी एक जण नोकरी, वकील, सेवानिवृत्त कर्मचारी व मजूर आहे.

हिंगणघाट मतदारसंघ
या मतदारसंघातील तेरा उमेदवारांपैकी तीन उमेदवार हे व्यवसाय करणारे आहेत. शेती करणाºया उमेदवारांची संख्या पाच असून नोकरी करणारे दोन व प्रत्येकी एक जण स्वयंरोजगार, मजुरी व काहीच न करणारे आहे.

देवळी मतदारसंघ
या मतदारसंघात सर्वाधिक १४ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी सहा उमेदवार व्यवसाय करणारे आहेत. तीन उमेदवार शेतकरी आहेत. तर प्रत्येक एक उमेदवार शिक्षक, पेन्शनर, वकील, माजी सैनिक व स्वयंरोजगार असलेले आहेत.

Web Title: Maharashtra Election 2019 : Farmers and business side by side

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा