शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

कालौघात महालक्ष्मीचेही रूपडे पालटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महालक्ष्मी पूजनाचा सण साजरा केला जातो. ग्रामीण भागासह शहरातही श्रीमंतांपासून तर गोरगरीबही आपापल्या परीने तीन दिवस हा सण साजरा करतात. गौरी पूजन कार्यक्रम नियम आणि प्रथेनुसारच साजरा केला जातो.

ठळक मुद्देउत्सवाला आधुनिकतेची झालर : साड्यांऐवजी आता नववारीचा साज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सर्वत्रच महालक्ष्मी पूजनाची (गौरी पूजनाची) शतकानुशतकाची परंपरा आहे. ही परंपरा आजही पिढी मोठ्या भक्तीभावाने जोपासत आहे. मात्र, बदलत्या काळात या महालक्ष्मी पूजनालाही आधुनिकतेचा साज चढविला जात आहे. यामुळे महालक्ष्मी पूजनाची तऱ्हा बदलली आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महालक्ष्मी पूजनाचा सण साजरा केला जातो. ग्रामीण भागासह शहरातही श्रीमंतांपासून तर गोरगरीबही आपापल्या परीने तीन दिवस हा सण साजरा करतात. गौरी पूजन कार्यक्रम नियम आणि प्रथेनुसारच साजरा केला जातो. पहिल्या दिवशी महालक्ष्मी बसविणे, दुसऱ्या दिवशी जेवण आणि तिसऱ्या दिवशी त्या पुन्हा काढून त्यांच्या पेटीत बंद करून ठेवल्या जातात. काही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आंबील गुळणीचा प्रसाद करतात. याला खूप महत्व आहे. आंबील करीत ज्वारीची आवश्यकता असते; पण आता ज्वारीचे पीक घेणे बंद झाल्याने काहीसा परिणाम जाणवतो. तरी विकतची ज्वारी आणून प्रसाद चढवितातच.या तीन दिवसात घरात धामधूम असते. कुळातील सर्व सदस्य आणि नातेवाईक या कार्यक्रमाला एकत्र येतात. काही गावात एका घराआड महालक्ष्मी बसतात. त्यामुळे गावात वेगळेच भक्तिमय वातावरण असते. सर्व एकमेकांच्या घरी मदतीलाही जातात. असा हा नियमावलीत बांधलेला सण उत्साहात साजरा करून त्याला कालौघात सजविले जात आहे.असा बदलत गेला साजसुरुवातीला महालक्ष्मी मांडण्यासाठी लाकडी पाट आणि त्यावर बांबूच्या सरत्यामध्ये धड असलेले हात बसवून महालक्ष्मी उभी केली जायची. त्यानंतर बांबूच्या सरत्याची जागा लोखंडी ग्रीलच्या कठड्यांनी घेतली. त्याही पुढे जाऊन कुणी दिवानवर, सोफासेटवर तर कुणी बंगळीवर महालक्ष्मीची स्थापना करू लागले. हे करीत असताना हात आणि मुखवटे मांडण्याची पद्धत कायम राखली. आता साऱ्याच बाबतीत शोध लावल्या जात असल्याने चक्क कृत्रिम अवयव तयार करून महालक्ष्मी उभी केली जात आहे. त्यांचा रेखीव चेहरा, हात-पाय आणि त्यावर नववारी साज. हे देखणं रूप भाविकांना भुरळ घालत आहे. त्यात एक आजी एक नात आणि झोल्या-झोली असतात. यातील झोल्या-झोली तर जणू बाहुलेच वाटतात.