लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यातील महाबळा व लगतच्या परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास दमदार पाऊस झाल्याने महाबळा ते इटाळा रस्त्यावर असलेल्या नाल्याला पूर आल्याने पावसाचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने आजनगाव, धपकी, दहेगावकडे जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल दोन तास ठप्प होती. पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. कपाशी व सोयाबीनच्या पेरण्या सुरू आहे. सेलू व लगतच्या परिसरात तुरळक पावसाच्या सरी येत आहे. मात्र, महाबळा परिसरात झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी दुपारी आलेल्या पावसाने पुलावरील डांबरीकरण खरडून गेले असून पुलावर मोठे खड्डे पडले आहे. नाल्याला पूर आल्याने नाल्यावरील रस्त्यावरून ओसंडून पाणी वाहत असल्याने पुलावरून जाणारी दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे नाल्याच्या काठावर अडकलेल्या शेतकरी, शेतमजूर व समृद्धीच्या कामावरील कामगारांना घरी पोहचण्यास विलंब झाला. महाबळा ते इटाळा मार्गावर असलेल्या पुलावर पावसाळयात नेहमीच पुराचे पाणी ओसंडून वाहते. त्यामुळे रहदारीची अडचण होते. हा पूल उंच करण्याच्या मागणीसाठी सरपंच जोत्स्ना पोहाणे यांनी गावकऱ्यांना सोबत घेत अनेकदा संबंधितांकडे विनंती केली. पण, त्यांच्या विनंती अर्जाला केराची टोपली दाखविण्यात आली. पावसाळयाला सुरूवात झाली असून आगामी काळात दमदार पाऊस झाल्यास याचा त्रास परिसरातील शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. प्रशासनाने याची दखल घेत तत्काळ या पुलाची उंची वाढविण्याची गरज आहे.पूलाची उंची वाढवामहाबळा ते इटाळा मार्गावरील असलेल्या नाल्यासमोर यावर्षी बंधाºयाचे बांधकाम झाले. त्यामुळे पुलावरून नेहमीच पाणी वाहते. सिमेंट पाईपचा हा पूल असून रस्ता खचून रस्त्यावरील डांबरही पावसाच्या पाण्याने वाहून गेले. त्यामुळे आगामी काळात महाबळा ते इटाळा हा रस्ता शेतकºयांसाठी बंद होण्याची भीती आहे. संबंधित विभागाने पुलाची उंची वाढविल्यास नेहमीच्या त्रासातून सर्वांची सुटका होईल.
महाबळा-इटाळा मार्गाची वाहतूक दोन तास ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:00 IST
खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. कपाशी व सोयाबीनच्या पेरण्या सुरू आहे. सेलू व लगतच्या परिसरात तुरळक पावसाच्या सरी येत आहे. मात्र, महाबळा परिसरात झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी दुपारी आलेल्या पावसाने पुलावरील डांबरीकरण खरडून गेले असून पुलावर मोठे खड्डे पडले आहे.
महाबळा-इटाळा मार्गाची वाहतूक दोन तास ठप्प
ठळक मुद्देनाल्याला आला पूर : पूल उंच करण्याची मागणी