शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

निमसडा येथे सील केलेल्या वाळूवर माफियांनी मारला डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 05:00 IST

वाळू घाटांचा लिलाव झाला नसला तरी वायगाव भागात सध्या अनेक वाळू तस्कर सक्रीय झाले आहेत. या भागातील वाळू तस्करांडून यशोदा नदीचे पात्र मनमर्जीने पोखरून वाळूची वाहतूक केली जात आहे. वाळू माफियांच्या मनमर्जीला ब्रेक लावण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करून निमसडा शिवारात वाळूचा ढिग सील केला. मात्र, वाळू चोरट्यांनी आपल्याला कुणाचीही भीती नाही असे दाखवत सील केलेला वाळूसाठाच चोरून नेल्याचे उजेडात आले आहे.

ठळक मुद्दे७.५० लाखांचा महसूल बुडाला

  लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : नजीकच्या निमसडा शिवारात यशोदा नदीच्या काठावर धडक कारवाई करून तब्बल ७.५० लाख रुपये किंमतीचा वाळूसाठा सील करण्यात आला होता. पण हिच वाळू या भागातील वाळू तस्करांनी लंपास केल्याने शासनाचा मोठा महसूल बुडाला आहे. या भागातील वाळू माफिया चक्क सील केलेल्या वाळूचीही चोरी करीत असल्याने त्यांना कुठल्या बड्या अधिकाऱ्याचा आशीर्वाद तर नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाळू घाटांचा लिलाव झाला नसला तरी वायगाव भागात सध्या अनेक वाळू तस्कर सक्रीय झाले आहेत. या भागातील वाळू तस्करांडून यशोदा नदीचे पात्र मनमर्जीने पोखरून वाळूची वाहतूक केली जात आहे. वाळू माफियांच्या मनमर्जीला ब्रेक लावण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करून निमसडा शिवारात वाळूचा ढिग सील केला. मात्र, वाळू चोरट्यांनी आपल्याला कुणाचीही भीती नाही असे दाखवत सील केलेला वाळूसाठाच चोरून नेल्याचे उजेडात आले आहे. निमसड़ा परिसरात तलाठी नदकिशोर मुडे आणि प्रविण हाडे यांनी धडक कारवाई करून सुमारे १२५ ब्रास वाळू जप्त केली होती. या वाळूची किंमत ७ लाख ५० हजारांच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. वाळू सील करण्याची कारवाई करताना वाळूच्या ढिगाला चुना लावण्यात आला हाेता. शिवाय हे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदारांकडून वळते करण्यात आले होते. पण वाळू माफियांनी सील केलेली वाळूच चोरून नेत शासनाला चूना लावला आहे. या प्रकरणी तहसीलदार कठोर भूमिका घेत वाळू चोरट्यांवर फौजदारी कारवाई करतात काय, की चिरी-मिरीचा व्यवहार होत हे प्रकरण दडपले जाईल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. देवळी तालुक्यातील काही वाळू माफिया या भागातून वाळूची चोरी करीत असल्याची माहिती महसूल विभागाला आहे. पण त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. 

यशोदा नदीपात्र सध्या वाळू माफिया पोखरत आहे. वाळू माफियांच्या मनमर्जीला ब्रेक लावण्यासाठी धडक कारवाई करून मौजा निमसडा येथे १२५ ब्रास वाळू सील करण्यात आली होती. अधिक चौकशीदरम्यान ही वाळू अजय बाबाराव कुरटकर यांनी साठवल्याचे पुढे आले होते. शिवाय पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण तहसीलदारांकडे पाठविण्यात आले आहे. सील केलेल्या वाळूची चोरी होऊ शकते असे मत आपण मांडले होते. तर आता सील केलेली वाळू चोरी जात आहे. संबंधितावर तहसील प्रशासन कार्यवाही करणार.- नदकिशोर मुडे,तलाठी आलोडा (बोरगाव).

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया