शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यातही लम्पीचा शिरकाव; सात जनावरांमध्ये आढळली लक्षणे

By आनंद इंगोले | Updated: September 21, 2022 15:20 IST

४ गावे बाधित तर २४ गावे सतर्कता क्षेत्र; प्रतिबंधीत उपायोजनांना सुरुवात

वर्धा : राज्याभरात लम्पी चर्म रोगाने चांगलाच हाहाकार माजविला असून वर्धा जिल्हा यापासून लांब होता. पण, नुकताच जिल्ह्यातील आर्वी आणि आष्टी तालुक्यातील चार गावांमध्ये लम्पी आजाराचे लक्षणे असलेली सात जनावरे आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणा अ‍ॅक्शनमोडवर कामाला लागली.

राज्यातील प्रमुख शहरांपाठोपाठ आता वर्धा जिल्ह्यातही गोवंशीय पशुधनात लम्पी चर्म रोगाचा शिरकाव झाला आहे. आर्वी तालुक्यातील हिवरातांडा, आर्वी शहर व सावळापूर, आष्टी तालुक्यातील वडाळा या चार गावांमधील सात जनावरांना लम्पीचे लक्षणे दिसून आली. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या चार गावांना बाधित क्षेत्र म्हणून जाहीर केले. त्यासोबतच बाधित गावांपासून ५ किलो मीटर अंतरापर्यंतच्या परिसरातील २४ गावांना सतर्कता क्षेत्र जाहीर केले आहे. यामध्ये हिवरातांडा परिसरातील हर्रासी, पाचोड, बेल्हारातांडा, हिवरा, जामखुटा, राजणी. आर्वी परिसरातील खडकी, शिरपूर, पिपळा (पु.), वाढोणा (पु.), मांडला, धनोडी (नां.). सावळापूर परिसरातील अंतरडोह, जाम (पु.), जाम, लहादेवी, पांजरा, हरदोली, बाजारवाडा आणि वडाळा परिसरातील बोरगाव, टुमणी, झाडगाव, वर्धपूर, सत्तरपूर या गावांचा समावेश आहे. बाधित क्षेत्र आणि सतर्कता क्षेत्रातील गावांमधील जनावरांना इतर कोणत्याही निरोगी भागात प्रवेशास प्रतिबंधित करण्यात आले आहे. बाधित आढळून आलेल्या जनावरांचे विलगीकरण करण्यात आले आहे. या जनावरांना चारा व पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबत संबंधित नगरपंचायत व ग्रामपंचायतींना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. बाधित जनावरांच्या संपर्कातील वैरण, गवत किंवा अन्य साहित्य, प्राण्याचे शव, कातडी यास इतरत्र प्रवेश आणि वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.प्रशासन ऑन दी स्पॉट

आर्वी आणि आष्टी तालुक्यातील जनावरामध्ये लम्पी चर्म रोगाची लक्षणे आढळून आल्याने प्रशासने कामाला लागले आहे. लागलीच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी बाधित क्षेत्राला भेटी देवून जनावरांची पाहणी करीत शेतकºयांसह पशुपालकांशी संवाद साधला. यावेळी उपविभगीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वासनिक, डॉ. वंजारी यांच्यासह विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगcowगायwardha-acवर्धा