शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

निम्न वर्धा, बोर अन् लाल नालाचे दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 05:00 IST

समुद्रपूर तालुक्याती लाल नाला प्रकल्प १०० टक्के भरला असून, तालुक्यात उसंत घेत पाऊस सुरू आहे. त्यामुळे या जलाशयात येणारा पाण्याचा ओढा लक्षात घेत तसेच धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकल्पाचे पाच दरवाजे १० सेंमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पातून नदीपात्रात ३२.०२ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील २४ तासांत जिल्ह्यात १४९.५१ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली असून सततच्या पावसामुळे जलाशयांमधील पाणीपातळीत वाढ झाल्याने आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा, सेलू तालुक्यातील बोर धरण तसेच समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. तीन जलाशयातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील २४ तासांत वर्धा तालुक्यात २६.६२ मिमी, सेलू तालुक्यात २८.०० मिमी, देवळी तालुक्यात १६.६०, हिंगणघाट तालुक्यात २२.०० मिमी, समुद्रपूर तालुक्यात ३८.७४ मिमी, आर्वी तालुक्यात १४.१० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ३.४५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत ७३६५.७० मिमी पाऊस पडतो, तर यंदाच्या वर्षी आतापर्यंत जिल्ह्यात ७१२८.६७ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पाच्या पाच दरवाजातून ३२.०२ क्युमेक पाण्याचा विसर्ग- समुद्रपूर तालुक्याती लाल नाला प्रकल्प १०० टक्के भरला असून, तालुक्यात उसंत घेत पाऊस सुरू आहे. त्यामुळे या जलाशयात येणारा पाण्याचा ओढा लक्षात घेत तसेच धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकल्पाचे पाच दरवाजे १० सेंमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पातून नदीपात्रात ३२.०२ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सावधान : वणा नदी पात्रात होतोय पाण्याचा विसर्ग- हिंगणघाट : तालुक्यातील वडगाव या प्रकल्पाचे तीन तर नांद प्रकल्पाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वणा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांमधील नागरिकांनी दक्ष राहण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे यांनी दिल्या आहेत. मंगळवारी सकाळी वडगाव धरणाचे तीन दरवाजे आणि नांद धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. या धरणांमधून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग थेट वणा नदीच्या पात्रात होत असून नागपूर, उमरेड भागात उसंत घेत पाऊस सुरू असल्याने या दोन्ही जलाशयात पाण्याचा वेग वाढणार आहे. हे दोन्ही जलाशय १०० टक्के भरली असून सध्या जलाशयाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वणा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे वणा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सेलू तालुक्यातील बोर प्रकल्पातून १३६.११ क्युमेक पाण्याचा विसर्ग- सेलू तालुक्यातील बोर प्रकल्प ९६.४७ टक्के भरला असून या प्रकल्पाचे सात दरवाजे २५ सेंमीने उघडण्यात आले आहेत. सध्या या जलाशयातून १३६.११ क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सेलू तालुक्यातील बोरी, हिंगणी, मोई, किन्ही, घोराड, बेलगाव, सेलू, ब्राह्मणी, कोटंबा, मडका, चानकी, कोपरा, देऊळगाव, गोहदा बुजुर्ग, आर्वी, धामणगाव, धानोली, सुकळी, जयपूर, खडका, पिंपळगाव तर समुद्रपूर तालुक्यातील आष्टा, जेजुरी, बाळापूर, देरडा, खुणी, नांद्रा, सावंगी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नदी काठावरील गावांनी अशी घ्यावी काळजी...

- कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नये.- नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.- मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये.- जुन्या मोडकळीस आलेल्या घरात तसेच इमारतीत आश्रय घेऊ नये.- नदी किंवा नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यास जीव मुठीत घेऊन पूल ओलांडू नये.- धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नये.- प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकाेरपणे पालन करावे.

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण