शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कीडक कापसाच्या नावाखाली कमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:32 IST

बोंडअळी व विविध रोगांमुळे कपाशीचे उत्पादन कमालीचे घटले. यामुळे शेतकरी संकटात असताना कापसाचे भावही मागील ५-६ दिवसांत कमी झालेत. कापूस किडक असल्याचे कारण देत व्यापारीही केवळ ४ हजार रुपयांनी खरेदी करीत आहेत.

ठळक मुद्देमजुरीही वाढली : पंचनाम्यात अडकली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : बोंडअळी व विविध रोगांमुळे कपाशीचे उत्पादन कमालीचे घटले. यामुळे शेतकरी संकटात असताना कापसाचे भावही मागील ५-६ दिवसांत कमी झालेत. कापूस किडक असल्याचे कारण देत व्यापारीही केवळ ४ हजार रुपयांनी खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून मदतीची घोषणा केली. मात्र ही मदत पंचनाम्यात अडकली असल्याचे वास्तव आहे. कापसावर लाल्या व बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. परिणामी कापसाचे बोंड पूर्णत: सडले. त्यातून कापूस निघालाच नाही. अनेक शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कपाशी उपडून फेकली. यावर्षी कपाशीचे उत्पादन घटले. एकरी उत्पादनात घट आल्याने कापसाचे भाव तेजीत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. डिसेंबरच्या सुरूवातीला कापसाचा भाव ५५०० ते ५६०० रूपये क्विंटल पर्यंत वाढला. जानेवारीच्या महिन्यात चांगल्या कापसाला ५००० ते ५१०० रूपये भाव होता. किडक कापूस ३५०० ते ४००० रूपये दराने व्यापारी खरेदी करीत असल्याने लागवडीचा खर्च निघण्याची आशा मावळली.लागवडीचा खर्च निघण्याची आशा धूसरशेतकरी दुष्काळाने पिडलेला असताना नगदी पीक असलेल्या कपाशीवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. शासनाकडून आर्थिक मदत देण्याची घोषणा नागपूर हिवाळी अधिवेशनात करण्यात आली होती. हेक्टरी ३० हजार रूपये मदत देऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी अद्याप कोणतीच कार्यवाही सुरू झालेली नाही. कापसाच्या पिकाला अनुदान जाहीर करावे ही अपेक्षा होती. शासनाने ते कामही सर्वेक्षणाच्या माध्यमातून चालू केले. यात अगोदर विविध अटी घालून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. अर्ज भरण्याची अट घातली. यात शेतकऱ्यांची धावपळ झाली व पैसेही खर्च झाले. यावर्षी शेतकऱ्यांना कपाशीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागला. कपाशी उंच वाढल्याने फवारणीचाही खर्च वाढला. शिवाय वेचणी मजुरांमार्फत करावी लागली. यामुळे शेतकऱ्यांना किलोमागे दिडशे रूपये अतिरिक्त मोजावे लागले होते. सध्या किडक कापसाला चार हजार भाव दिला जातो तर चांगल्या कापसाला ५ हजार भाव मिळत असल्याने शेतकरी व्यथीत झाला आहे.