शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

समाजाच्या प्रेमातून मानवतावादी कार्याची ऊर्जा मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:28 IST

आदिवासींची संस्कृती अज्ञान गरीबाची असली तरी ती उच्च संस्कृती आहे. या संस्कृतीला मोठे करण्याचे काम आम्ही करतो आहो. या मानवतेच्या कार्याला समाजाकडून मिळालेले प्रेम हिच आमच्या कामाची उर्जा ठरते, असे प्रतिपादन रमन मॅगसेसे या जागतिक पुरस्कार विजेते ....

ठळक मुद्दे प्रकाश आमटे : सोरटा येथे ‘प्रकाशपर्व’ कार्यक्रम, आमटे दाम्पत्यासह उल्लेखनीय कार्य करणाºयांचा केला सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव/रोहणा : आदिवासींची संस्कृती अज्ञान गरीबाची असली तरी ती उच्च संस्कृती आहे. या संस्कृतीला मोठे करण्याचे काम आम्ही करतो आहो. या मानवतेच्या कार्याला समाजाकडून मिळालेले प्रेम हिच आमच्या कामाची उर्जा ठरते, असे प्रतिपादन रमन मॅगसेसे या जागतिक पुरस्कार विजेते तथा समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. ते सोरटा येथील प्रकाशपर्व कार्यक्रमात बोलत होते.स्व. मंदाताई वनस्कर ग्राम विकास बहुउद्देशीय संस्थेद्वारे प्रकाशपर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. अमर काळे, जि. प. सदस्य ज्योती निकम, वैजयंती वाघ, पं. स. सदस्य अरूणा सावरकर, सरपंच अर्चना आंबेकर, गजानन निकम, पुनेश्वर वनस्कर, गजानन वनस्कर, केंद्रीय दारूगोळा भांडाराचे सुरक्षा अधिकारी वैभव वर्मा, पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुराडे, पं.स. सदस्य दिलीप अग्रवाल, राहुल चोपडा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.डॉ. आमटे पुढे म्हणाले, दुर्गम भागात आदिवासीसाठी दवाखाना, शिक्षण, रोजगारांच्या संधी, शेती व्यवसाय व विकासाची जनजागृती याबाबत ४५ वर्षापूर्वी डॉक्टर झाल्यानंतर भामरागड भागात बाबांनी आम्हाला पिकनिकसाठी नेले होते. ती पिकनिकच आमच्या जीवनाला वळण देणारी ठरली. घनदाट जंगलात जीवनातील अंधारामुळे माणूसच माणसाला भीत होते. तिथे अहोरात्र झिजून माणूस असो की रानटी श्वापद सगळ्यांना आपलसे केले. आज माणसासोबतच रानरेडा, अस्वल, बिबट, हरिण, साप या सारखे, प्राणी जेव्हा मित्रासारखे प्रेमाने राहतात हिच आमची खरी साधना ठरते असे त्यांनी सांगितले.डॉ. मंदाकिनी आमटे यांनी ४५ वर्षांच्या काळात डॉ. प्रकाश सोबत केलेल्या आदिवासी विकासाच्या कामाचे आपणाला मनापासून समाधान आहे. आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याचे यामुळे मला वाटते, असे त्यांनी सांगितले.आ. अमर काळे यांनी डॉ. आमटे दाम्पत्यांचा गौरव करून त्यांच्या कार्यापासून सर्वांनी प्रेरणा घेऊन स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा संस्थाध्यक्ष पुनेश्वर वनस्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजकाच्यावतीने व्ही. एन. गवई, मारोती विरूळकर, निलेश ढोकणे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सुबोध चचाणे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान जि. प. प्राथमिक शाळा सोरटा येथील विद्यार्थ्यांनी बँड पथकासह संचालन केले. विद्यार्थ्यांनी प्रार्थना गीत व स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाला ग्रामस्थांसह शहरवासियांची उपस्थिती होती.कार्यक्रमाला स्थानिक आमदारांसह लोकप्रतिनिधींची दांडीया कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेनुसार आ. रणजित कांबळे, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, शिक्षण सभापती जयश्री गफाट यांना बोलाविण्यात आले होते. परंतु, त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. त्यांच्या दांडीमुळे कार्यक्रमस्थळी या प्रकाराची उपस्थितात चर्चा होती.