शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आरक्षणाच्या आॅनलाईन नोंदणीला देशभरातून उदंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 12:37 IST

एकच मिशन शेतकरी आरक्षण या चळवळीला लोकाभिमूख करण्याच्या उद्देशाने मिशनच्यावतीने शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळ (वेबसाईट ) सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देहिंदी व मराठीत नोंदणीची सोय२६ हजारांवर पोहोचला आकडा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एकच मिशन शेतकरी आरक्षण या चळवळीला लोकाभिमूख करण्याच्या उद्देशाने मिशनच्यावतीने शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळ (वेबसाईट ) सुरू करण्यात आले आहे. या नोंदणीला देशाच्या व देशाबाहेरूनही शेकडो तरुण व शेतकऱ्यांनी भेट देत आपल्या नावाची नोंद करीत शेतकरी आरक्षण मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे. एकाच दिवशी २६ हजार जणांची नोंदणी झाली आहे.हिंदी व मराठी भाषेतूनही नोंदणी करण्याची सोय एकच मिशन शेतकरी आरक्षणाच्या वेबसाईटवर करण्यात आली आहे. शेतकरी आरक्षण वा किसान आरक्षण, या नावाने ही व्यवस्था करण्यात आली असून लवकरच या चळवळीला लोकाभिमूख करण्याचा मानस या आरक्षणाचे पुरस्कर्ते शैलेश अग्रवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.महाराष्ट्रसह देशात शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. आतापर्यंत देशभरात ५० हजारांवर अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक, सामाजिकदृष्ट्या बळकट करण्याच्या उद्देशाने ‘एकच मिशन शेतकरी आरक्षण’ ही चळवळ सेवाग्राम येथील बापूकुटी परिसरातून एक वर्षापूर्वी सुरू करण्यात आली. अनेक ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकरी आरक्षणाचे ठराव पारित केले. त्यानंतर अलीकडेच राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे राष्ट्रय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पुणे येथे एका कार्यक्रमात शेतकरी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून शेतकऱ्यांना आरक्षण देण्याबाबत जाहीर भूमिका मांडली. त्यामुळे या चळवळीला व्यापक स्वरूप देण्याचा निर्णय शैलेश अग्रवाल यांनी घेतला. गुढीपाडव्यापासून हिंदी व मराठी भाषेत जनपाठिंब्यासाठी नोंदणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात शेतकऱ्याचे नाव, त्याचा मोबाईल क्रमांक, त्याचे गाव, त्याचा जिल्हा आदी बाबींची नोंद घेण्यात येत आहे. या सर्व बाबी नोंदविल्यानंतर शेतकऱ्यांचे मतही यावर मागविले जात आहे. एकाच दिवसात २६ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विविध भागातून आपल्या नावाची नोंदणी केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे यात शेतकरी आरक्षणाचे समर्थक आहेत काय? व शेतकरी आरक्षणाचे विरोधक यांचीही बाजू मांडण्याची सोय करण्यात आली. ‘डब्ल्युडब्ल्युडब्ल्यु.किसान आरक्षण. कॉम’ या संकेतस्थळावर नोंदणीची सोय उपलब्ध आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी