शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

ग्रामीण भागात ‘लोकवाहिनी’ पोहचेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 5:00 AM

जिल्ह्यात वर्धा, आर्वी, पुलगाव, तळेगाव (श्या.), हिंगणघाट असे एकूण पाच आगार आहेत. या पाचही आगार मिळून तब्बल २२८ बसेस रस्त्यावर धावतात. ५६५ चालक, तर ४७३ वाहकांच्या भरोशावर एसटीचा गाडा हाकणे सुरू आहे. मात्र, १३ लाखांवर असलेल्या लोकसंख्येसाठी केवळ २२८च लोकवाहिनी असल्याने जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात तसेच जिल्ह्याच्या सीमेवरील गावांमध्ये लोकवाहिन्या पोहोचू शकत नसल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देतत्कालीन सरकारचे आश्वासन फोल : बसेसअभावी ग्रामिणांना बसतोय आर्थिक भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘नागरिकांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वाक्य घेऊन सदैव चालणाऱ्या राज्य परिवहन महामंडळात पुरेशा बसेस उपलब्ध नसल्याने आजही जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘लोकवाहिनी’ पोहोचू शकत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तत्कालीन सरकारने वर्धा जिल्ह्यासाठी ५० नवीन बसेस देण्याची घोषणा केली होती. मात्र, ते आश्वासनही फोल ठरल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात वर्धा, आर्वी, पुलगाव, तळेगाव (श्या.), हिंगणघाट असे एकूण पाच आगार आहेत. या पाचही आगार मिळून तब्बल २२८ बसेस रस्त्यावर धावतात. ५६५ चालक, तर ४७३ वाहकांच्या भरोशावर एसटीचा गाडा हाकणे सुरू आहे. मात्र, १३ लाखांवर असलेल्या लोकसंख्येसाठी केवळ २२८च लोकवाहिनी असल्याने जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात तसेच जिल्ह्याच्या सीमेवरील गावांमध्ये लोकवाहिन्या पोहोचू शकत नसल्याचे चित्र आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गत वर्षीच्या मार्च महिन्यापासून जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. सर्व खासगी आणि शासकीय वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा कहर कमी झाल्याने हळूहळू राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू केली. त्याअनुषंगाने पाचही आगारातील एकूण २१० बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. एसटीतून दररोजचे उत्पन्न २० लाखांपर्यंत पोहोचले. मात्र, आता शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने बसफेऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. सध्या पाचही आगारातून २२८ बसेस सुरू आहे. मात्र, अखेरच्या टोकापर्यंत लोकवाहिनी पोहचविण्यासाठी आणखी २० ते २५ नव्या बसेसची गरज असल्याचे परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले. तत्कालीन फडणवीस सरकारने एसटी महामंडळाला नव्या ५० बसेस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तापालट होताच ते आश्वासनही हवेत विरल्याचे दिसून आले त्यामुळे आहे त्याच बसगाड्यांवर प्रवाशांची सेवा सुरू आहे. मात्र, अजूनही असे काही गावे आहेत की तेथील नागरिकांना अजूनही लालपरीचे दर्शन झाले नाही. त्यामुळे बसेसची उपलब्धता वाढविण्याची गरज आहे. अनेक रस्त्यांवरून बसेस धावत असताना अचानक बंद पडत असल्याने  नव्या बसेसची गरज निर्माण झाली आहे.

विद्यार्थ्यांचे होताय शैक्षणिक नुकसान... जिल्ह्यात परिवहन मंडळाची बससेवा हळूहळू पूर्वपदावर आली आहे. मात्र, शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने अजूनही जिल्ह्यातील अनेक गावांत लोकवाहिनी पोहोचत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने अनेकांना खासगी वाहनाने प्रवास करणे परवडत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

गावात पहिल्यांदाच झाले गावकऱ्यांना बसचे दर्शनजिल्ह्यातील अनेक गावे असे आहेत की, जेथे अजूनही बस पोहोचली नसून गावकऱ्यांना लालपरीचे दर्शन दुर्लभ झाले. मात्र, काही गावांमध्ये पहिल्यांदाच लालपरी पोहोचल्याने नागरिकांनी परिवहन मंडळाचे आभार मानले. लालपरी गावात पोहोचल्यानंतर नागरिकांनी चालकासह वाहकाचा सत्कार केला. एसटी बस गावात पाेहोचल्याने नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. 

 

टॅग्स :state transportएसटी