शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राममध्ये बापू दप्तरला लॉकडाऊनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 11:45 IST

राष्ट्रीय आणि स्वातंत्र्य चळवळीच्या घडामोडी ज्या कार्यालयातून होत असे त्या बापू दप्तरच्या नुतनीकरणाला लॉकडाऊनचा फटका बसल्याने निर्धारित कालावधी पेक्षा जास्त वेळ लागणार असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देनिर्धारित कालावधी पेक्षा लागत आहे वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम: राष्ट्रीय आणि स्वातंत्र्य चळवळीच्या घडामोडी ज्या कार्यालयातून होत असे त्या बापू दप्तरच्या नुतनीकरणाला लॉकडाऊनचा फटका बसल्याने निर्धारित कालावधी पेक्षा जास्त वेळ लागणार असल्याचे दिसून येत आहे.गांधीजींनी आश्रमची स्थापना केल्यानंतर आपल्या विचारांना प्रत्यक्ष साकार करण्याचा प्रारंभ सुरू केला.आश्रमातील आदी निवास मधूनच बापू कार्य करीत होते. पण कालांतराने गरजेनुसार कुट्या बणविल्या गेल्या. यातीलच बापू कुटीच्या बाजूच्याच मीरा बहन यांच्या कुटीलाच दप्तर बणविण्यात आले. बापू आणि दप्तरमध्ये कार्य करणाऱ्यांना सुध्दा सोईचे झालेले होते.पण कालौघात कुटी झुकल्याने धोका होऊ नये म्हणून आश्रम प्रतिष्ठानने विचार विनिमयातून नुतणीकरणाचा निर्णय घेतला.तब्बल ८२ वषार्नी या कार्यालयाला नुतणीकरणाचा योग लाभला. ऐतिहासिक असल्याने अभ्यासपूर्वक आणि तसेच काम करणारे सुतार आवश्यक होते.योगायोगाने ते उपलब्ध असल्याने कामाला डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात झाली.मार्चमध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. पण कामे अत्यंत बारकाईचे असल्याने कालावधी वाढू लागला. यातच कोरोना वायरस आणि नंतर लॉकडाऊन चा परिणाम येथील कामावर झाला.आश्रमातील नियमित कर्मचारी माती आणि सारवणाचे अंतिम टप्प्यातील कामे करीत आहेत. दरवाजे तयार आहेत. सध्या तरी लॉकडाऊन दि.३ मे पर्यंत आहे.पुढे वाढतो का? हा प्रश्न आहे. यामुळे तज्ञालाही आश्रमात येऊन पाहणी करता येत नसल्याने महत्त्वाचे काम खांबलेले आहे.फ्लोरींगचे काम झाल्यावरच साहित्य ठेवण्यात येईल. त्यामुळे सध्यातरी प्रतिक्षा करावी लागेल.कोरोना वायरसचे संकट कमी झालेले नाही.लॉकडाऊन असल्याने कामात व्यत्यय आलेला असून १० मे पर्यंत काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे....टी.आर ऐन.प्रभू अध्यक्ष सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.फ्लोरींगचे महत्त्वाचे काम बाकी आहे. तज्ज्ञाचे मत घेण्यात येईल....विजय धुमाळे, विभाग प्रमुख सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSewagramसेवाग्राम