लॉकडाऊन मध्येही दारू विक्री सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:00 AM2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:09+5:30

कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचारी रुग्णालयात तर पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावत आहे. याचाच फायदा गल्ली बोळीत अवैध दारू विक्रेते घेत आहे. दारूबंदी नसलेल्या शहरातील परवानाधारक, बियरबार व दारुची दुकाने बंद करण्यात आली आहे. परंतू दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात मात्र अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. भाजीपाला मिळणे कठीण परंतु दारू मात्र सहज उपलब्ध अशी स्थिती आहे.

Lockdown also facilitates alcohol sales | लॉकडाऊन मध्येही दारू विक्री सुसाट

लॉकडाऊन मध्येही दारू विक्री सुसाट

Next
ठळक मुद्देअवैध दारू विक्रेते जुमाने ना : ग्रामीण भागात चढ्या दराने दारूची विक्री वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचार बंदी लागू आहे. अशा स्थितीत केवळ जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प आहेत. परंतु जिल्ह्यात दारूबंदी असताना संचार बंदीत ही दिवसभर दारू सर्वत्र मुबलक स्वरूपात उपलब्ध होत आहे. या अवैध दारू दुकानात ४ पेक्षा अधिक लोकांची गदीर्ही होत असल्याने उपविभागीय अधिकारी यांनी वेगळे पथक तयार करून कलम १४४ अंतर्गत कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचारी रुग्णालयात तर पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावत आहे. याचाच फायदा गल्ली बोळीत अवैध दारू विक्रेते घेत आहे. दारूबंदी नसलेल्या शहरातील परवानाधारक, बियरबार व दारुची दुकाने बंद करण्यात आली आहे. परंतू दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात मात्र अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. भाजीपाला मिळणे कठीण परंतु दारू मात्र सहज उपलब्ध अशी स्थिती आहे.
संचारबंदीचा लाभ घेत चढ्या दराने देशी, विदेशी दारू, बिअर, व गावठी दारू विक्री सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे. त्यामुळे अवैद्य दारुच्या दुकानातील सततच्या वर्दळीत एकमेकांच्या संपर्काने कोरोणाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊनचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असताना याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ नये. अवैध दारू विक्रीतून कोरोना विषाणू प्रसाराचा संभाव्य धोका लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनी दारू विक्रेत्या साठी वेगळे पथक तयार करून अवैध दारू विक्री व कलम १४४ चे उल्लंघन याबाबत संबंधीतांनवर कडक कारवाई करावी अशी मागणी हिंगणघाट येथील नागरिकांनी केली आहे.

अवैध दारुचे गुत्थे राजरोसपणे सुरुच
तळेगांव (शा.पं.) :- देशासह राज्यात कोरोणाने सर्वत्र थैमान घातल्याने साथरोग प्रतिबंधक कायद्याखाली जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हॉटेल्स, चहाटपरी, पानठेले जीवनावश्यक वस्तुचे दुकाने वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कोणतीही व्यक्ती, संघटना, संस्था यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तळेगावसह आजुबाजुच्या गाव परिसरातील अवैध दारुचे गुत्थे राजरोसपणे सुरु आहे. दारु काढण्याकरीता लागणारे साहीत्य हे ज्या दुकानात मिळते ते दुकान बरोबर या साहित्याचा पुरवठा करीत आहे. पोलिस यंत्रणेवर संचार बंदीचा ताण असल्याने अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे. गावागावात दारूची विक्री वाढली असून आता संचारबंदी काळात दारूचे उत्पादन व विक्रीचे दर वाढले आहे. याकडे पोलिस यंत्रणेने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावात दररोज दारूच्या दुकानाजवळ रांग दारू खरेदीसाठी लागलेली दिसत आहे. या गर्दीमुळे कोरोणा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Lockdown also facilitates alcohol sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.