सेलू : येथील बसस्थानकावरील वाहतूक नियंत्रकाच्या मनमानी कारभारामुळे व आगाराच्या वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे सेलू बस्थानकावर विद्यार्थ्यांची सवलतीच्या पाससाठी झुंबड उउत होती. बुधवारी कार्यालय चक्क दुपारी १२ वाजतापर्यंत कुलूप बंद होते. विद्यार्थी भर उन्हात खिडकीवर गर्दी करून होेते. मात्र वरिष्ठांनी दखल घेतली नाही. गुरूवारच्या ‘लोकमत’ला याबाबत वृत्त प्रकाशित करताच आगाराचे अधिकारी खडबडून जागे झाले व दुपारपर्यंत न उघडणारे कार्यालय चक्क सकाळी ९ वाजताच उघडण्यात आले.‘लोकमत’ने कुलूपबंद कार्यालय व विद्यार्थ्यांची उडालेली झुंबड याचे सचित्र वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे वरिष्ठांनी दखल घेवून येथील कर्मचाऱ्यांची कानउघडणी करून गुरूवारी सकाळी ९ वा. कार्यालय उघडून विद्यार्थ्यांना प्रवासाच्या सवलतीच्या पास देण्यात आल्या. खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सेलूला शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र निर्ठावलेला येथील वाहतूक नियंत्रक कर्मचारी कार्यालयात कधी वेळेवर येत नाही. लोकमच्या वृत्तामुळे विद्यार्थ्यांची सोय झाल्याने विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.(तालुका प्रतिनिधी)
सकाळी नऊ वाजताच उघडले कार्यालयाचे कुलूप
By admin | Updated: July 3, 2014 23:44 IST