शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

दिवाळ सणातही भटकंतीचेच जगणे

By admin | Updated: October 30, 2016 00:52 IST

हिंदू संस्कृतिमध्ये सण, उत्सवांना प्रचंड महत्त्वाचे स्थान आहे. शिवाय परंपरांचा भारी पगडा असल्याने गरीब असो वा श्रीमंत तो सणांची श्रीमंती पाळल्याशिवाय राहत नाही.

पाल टाकून राहुटी : उदरनिर्वाहासाठी विविध वस्तूंच्या विक्रीसाठी वणवणप्रशांत हेलोंडे  वर्धाहिंदू संस्कृतिमध्ये सण, उत्सवांना प्रचंड महत्त्वाचे स्थान आहे. शिवाय परंपरांचा भारी पगडा असल्याने गरीब असो वा श्रीमंत तो सणांची श्रीमंती पाळल्याशिवाय राहत नाही. प्रसंगी डोईवर कर्जाचा भारा सहन करीत सण, उत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल असतो; पण भटकंतीचे जीवन जगणाऱ्या, दोन वेळच्या जेवणासाठी जीवाचे राण करणाऱ्या, मुला-बाळांसाठी काही करता येते का यासाठी झटणारा एक वर्ग प्रत्येक सणांपासून अलिप्तच दिसून येते. समाजातील हे वास्तव कधी बदलणार, असाच सवाल जणू ती पाल टाकून वास्तव्य करणारी कुटुंबे करताना दिसतात. भारतीय समाज हा सण, उत्सव प्रिय आहे. प्रत्येक सण मग, तो कोणत्याही धर्म, जाती, समाजाचा असो येथे गुण्यागोविंदाने साजरा करण्यासाठी सर्वच जण धडपडत असल्याचे दिसते; पण काही कुटुंबे या सर्वांपासून अलिप्त असल्याचेच पाहावयास मिळते. त्यांच्या चिमुकल्यांना कसल्याही सण, उत्सवांची भ्रांत नसते. किंबहुना, कधी कुठला सण आहे, हे देखील या चिमुकल्यांना माहिती नसते. त्यांना केवळ कळते ते आई-वडिलांच्या सोबत अमूक वस्तू विकायला जायचे आहे. आता आपल्या सोबतचे सर्व कोणत्या गावात जाणार, तेथे किती दिवस राहणार हे देखील त्यांना माहिती नसते. यंदा दिवाळीचा सण हा सोयाबीन काढणीच्या वेळेवरच आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी आणि विक्रीची लगबग सुरू आहे. यासाठी महाराष्ट्रातील मराठवाडा, चंद्रपूर जिल्ह्यासह छत्तीसगड राज्यातील मजूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या मजुरांना कुठल्याही सणाची तमा नाही. केवळ दोन वेळच्या जेवणाची वा महिनाभर जगण्यापूरता पैसा कसा जमविता येईल, याचीच चिंता असते. यासाठी कुटुंबातील आबालवृद्ध या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात शेतांमध्ये राबताना दिसून येतात. या कुटुंबातील मुले-मुलीही शिक्षणाचा नाद सोडून आई-वडिलांच्या संगतीने शेतात राबताना दिसून येतात. या कुटुंबांवरही हार्वेस्टरने गंडांतर आणले आहे. दिवाळी हा महत्त्वाचा सण तोंडावर असल्याने अनेक शेतकऱ्यांनी लगबगीने शेतातील सोयाबीनची सवंगणी केली. सोयाबीनच्या भरवशावरच दिवाळी असल्याने शेतकऱ्यांचाही नाईलाज होता; पण या मजूर कुटुंबांचा मात्र पोटमारा झाल्याचे चित्र जिल्हाभर पाहावयास मिळत आहे. १०० कुटुंबे शहरात दाखल झाली असतील तर त्यातील ६० ते ७० कुटुंबांना काम मिळत असल्याचे चित्र आहे. दिवाळी सणासाठी विविध वस्तूंची विक्री करण्याकरिताही काही कुटुंबे शहरात डेरेदाखल झाली आहेत. या कुटुंबांचीही अशीच करुण कहाणी आहे. दिवसभर वस्तूंची विक्री केल्यानंतर सायंकाळी आपल्या चिमुरड्यांना भरवण्याइतपत मिळकत त्यांच्या पदरी पडत असल्याचे दिसून येते. शहराच्या काही भागात पाल टाकून वास्तव्य करणारी कुटुंबे आढळतात. या कुटुंबीयांना कुठल्या सणाचा मागमुस नसतो. केवळ पोटाची खळगी भरणे आणि त्यातून काही पदरी राहिले तर सण, उत्सव हेच त्यांचे जीवण झाल्याचे दिसून येत आहे. समाजातील हे वास्तव गत कित्येक वर्षांपासून बदलाची अपेक्षा केली जात आहे; पण ती निरर्थक ठरत असल्याचेच दिसून येत आहे. गावोगावी भटकंती करणाऱ्या या कुटुंबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या चिमुकल्यांना शिक्षणाचा गंध देण्याकरिता चिंतन व कार्याची जोड गरजेची झाली आहे.