गर्भवती-स्तनदा मातांकरिता आलेल्या शिºयात अळ्या अन् सोंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:27 PM2017-08-21T23:27:27+5:302017-08-21T23:28:01+5:30

गर्भवती आणि स्तनदा मातांकरिता शासनाच्यावतीने पोषण आहार म्हणून शिरा पुरविण्यात येतो.

The liver and sunde for the pregnant-lactating mothers | गर्भवती-स्तनदा मातांकरिता आलेल्या शिºयात अळ्या अन् सोंडे

गर्भवती-स्तनदा मातांकरिता आलेल्या शिºयात अळ्या अन् सोंडे

Next
ठळक मुद्देपिपरी (मेघे) अंगणवाडीतील प्रकार : जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गर्भवती आणि स्तनदा मातांकरिता शासनाच्यावतीने पोषण आहार म्हणून शिरा पुरविण्यात येतो. सुदृढ आरोग्याकरिता असलेल्या या शिºयात अळ्या अन् सोंडे निघाल्याने खळबळ माजली आहे. पिपरी (मेघे) येथील अंगणवाडीतून दिलेले पाकिट एका गर्भवती महिलेने सोमवारी घरी उघडले असता हा प्रकार समोर आला. अळ्या आणि सोंडेयुक्त पोषण आहारातून महिलांचे आरोग्य सुधारले जाईल अथवा त्यांचे आरोग्य खालावेल याचा विचार होणे गरजेचे आहे.
वर्धा शहरालगतच्या पिपरी (मेघे) भागातील अंगणवाडी केंद्रातून येथील एका गर्भवती महिलेला शिºयाचे पाकिट देण्यात आले. विशेष म्हणजे देण्यात आलेल्या शिºयाच्या पाकिटावर पॅकींग तारीख म्हणून जुलै २०१७ असे उल्लेखित आहे. सोबतच पॅकींग तारखेनंतर चार महिने हे उत्पादन खाण्यायोग्य असल्याचे म्हटले आहे. असे असताना आॅगस्ट महिन्यातच त्यातून अळ्या अन् सोंडे निघाल्याने शासनाच्या योजनेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्टÑ शासनाच्यावतीने महिला व बालविकास विभाग आयुक्तालयाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनदामाता यांच्यासाठी पोषण आहार योजना राबविण्यात येत आहे. यावर शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे. याच निधीतून राज्यातील ग्रामीण आणि शहरी अंगणवाडीत पोषण आहार म्हणून शिरा, उपमा, सुकडी आदी पदार्थ हवाबंद पॅकेटमधून पुरविण्यात येत आहे. यात मोठ्या प्रमाणात अनागोंदी झाल्याचे यापूर्वीही उघड झाले आहे. यामुळे गर्भवती व स्तनदा मातांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा आहार महत्त्वाचा असल्याने त्याबाबत शासनाने गंभीर असणे गरजेचे आहे.
चिक्कीनंतर शिºयात अळ्या
बालविकास प्रकल्पांतर्गत कुपोषित बालकांना देण्यात येणाºया चिक्कीत अळ्या निघाल्या होत्या. आता त्याच विभागांतर्गत गर्भवती आणि स्तनदा मातांना देण्यात येत असलेल्या शिºयाच्या पाकिटात अळ्या अन् सोंडे निघाले आहेत. यामुळे या पोषण आहाराच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात अनागोंदी झाल्याचा अंदाज सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.

पोषण आहाराचा पुरवठा शासनस्तरावरून होतो. या संदर्भात महिलेने एकात्मिक बाल विकास प्रकल्प संचालकांकडे तक्रार करावी. या संदर्भात पाकिटाचे नमुने घेवून चौकशी करण्यात येईल.
- विवेक इलमे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी तथा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी (प्रभारी), जि.प.

Web Title: The liver and sunde for the pregnant-lactating mothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.