शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सामाजिक तळमळीतून होते साहित्याची निर्मिती; ९६ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2023 17:55 IST

Nagpur News राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीमध्ये आज ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देसेवाग्रामच्या चरखागृहात लाइट ॲण्ड फाउंटेनची घोषणा

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी (वर्धा) : सामाजिक तळमळीतून साहित्याची निर्मिती होते. साहित्यातून समाजाला जगण्याचे बळ मिळते. त्यामुळे अशा साहित्य संमेलनाची आवश्यकता असून येथील आयोजन हे सुदृढ सांस्कृतिक लोकशाहीचे विराट रूप आहे, असेही प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीमध्ये आज ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर, मावळते अध्यक्ष भारत सासने, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे, प्रमुख अतिथी हिंदी साहित्यिक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार डॉ. पंकज भोयर, अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे, संरक्षक सागर मेघे, कार्याध्यक्ष प्रदीप दाते, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या स्पर्शामुळेच नव्हे तर वास्तव्यामुळे ही भूमी पावन झाली आहे. विशेष म्हणजे या महात्म्यांचे साहित्यात मोलाचे योगदान आहे. सेवाग्राम येथील चरखागृहात बापू आणि विनोबा यांचे शिल्प उभारण्यात आले आहे. त्यांचे विचार आणि जीवन नव्यापिढीला कळावे, याकरिता आमदार डॉ. पंकज भोयर यांच्यासह आयोजकांनी त्या ठिकाणी ‘लाइट अॅण्ड फाउंटेन शो’ ची मागणी केली होती. त्याकरिता निधी उपलब्ध करून देत लवकरच निर्मिती करणार, अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी विश्वनाथप्रसाद तिवारी, डॉ. कुमार विश्वास, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे, प्रदीप दाते यांचीही भाषणे झाली.

शासनाकडून दोन्ही अध्यक्षांचा सत्कार

अखिल भारतीय साहित्य संमेलनाकरिता उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आयोजकांच्यावतीने शाल, सूतमाळ, ग्रंथसंपदा आणि गांधी चरखा देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महराष्ट्र शासनाच्यावतीने संमेलनाचे मावळते अध्यक्ष भारत सासने व विद्यमान संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे स्वागत केले.

अध्यक्षांना देणार राज्य अतिथींचा दर्जा

अखिल भारतीय साहित्य संमेलनातून साहित्यिक लेखकांना मान देण्याचा प्रयत्न केला जातो. साहित्यिकांचा मानसन्मान करणे हे, शासनाचेही कर्तव्य आहे. साहित्यिकांच्या लेखणीतूनच राजकारण्यांना दिशा मिळत असते. म्हणूनच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना राज्य अतिथींचा दर्जा देण्याची मागणी केली होती, ही मागणी पूर्ण करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी करून पुढील कार्यवाही लवकरच केली जाणार असल्याचेही सांगितले.

मराठी शाळा बंद होतेय, त्यावरही चर्चा व्हावी : दीपक केसरकर

मायमराठीच्या संवर्धनासाठी, समृद्धतेसाठी साहित्यिकांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहे. त्याला शासनाकडूनही मदतीचा हात दिला जात आहे. महाराष्ट्र ही सामाजिक क्रांतीची भूमी आहे आणि वर्ध्यात हे संमेलन होत असल्याने वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. त्यामुळेच आज या साहित्यनगरीमध्ये सारस्वतांची पंढरी अवतरली आहे. मराठी विश्वकोषाची निर्मिती महाराष्ट्राने केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील साहित्याचा हा रथ पुढे नेण्याकरिता सर्वांचा हातभार लागण्याची गरज आहे. म्हणून मी मंत्री असलो तरीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने संमेलनाकरिता दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. सध्या मराठी शाळा बंद पडत असून याबाबतही या साहित्य संमेलनात चर्चा व्हावी, अशी अपेक्षा शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ