शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवजीवन एक्स्प्रेसमधून दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 23:36 IST

नवजीवन एक्स्प्रेसमधील अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या इसमांकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने ९ आॅगस्ट रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास ३८ हजार ९० रूपयाचा दारूसाठा जप्त केला. जळगाव येथील दोन इसमाजवळील ९ बॅगमधून ही दारू जप्त करण्यात आली.

ठळक मुद्देजळगावच्या दोघांना अटक : रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवजीवन एक्स्प्रेसमधील अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या इसमांकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने ९ आॅगस्ट रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास ३८ हजार ९० रूपयाचा दारूसाठा जप्त केला. जळगाव येथील दोन इसमाजवळील ९ बॅगमधून ही दारू जप्त करण्यात आली.रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक सुरेश कांबळे यांना नवजीवन एक्स्प्रेसमधून दोन व्यक्ती एस ४ व एस ७ या कोचमधून दारू आणत आहेत, अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर वर्धा-हिंगणघाट रेल्वे स्थानकादरम्यान दोन व्यक्तींची सेवेवर तैनात असलेले पोलीस हवालदार गजानन आगमने, अनिकेत धांडे, विकास बोरवर, निलेश मोरे यांनी चौकशी केली. जळगाव येथील रहिवासी असलेले किरण फुलसिंग जाधव (२५) व राज सुरेश भाट (२२) यांच्याजवळ असलेल्या ९ बॅगची तपासणी करण्यात आली. त्यात १ हजार ४६५ देशी दारूच्या ३८ हजार ९० रूपयाच्या बॉटल आढळून आल्या. या दोघांवरही रेल्वे पोलिसांनी दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर दारू त्यांनी कुठून आणली होती, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. वर्धा, चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे, मात्र रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर दारूची चोरटी वाहतूक केली जाते.गावठी दारूचा १ लाख ६० हजार रूपयांचा साठा केला नष्टतळेगांव (शा.पं.) - तळेगांव पोलीसांनी जामनेर शिवारातील मन्नत बुवा टेकडी परिसरात शुक्रवार छापा टाकून १८ ड्रम मधील ३ हजार लीटर मोहा, सडवा असा एकूण १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. सदर कारवाई ठाणेदार रविकुमार राठोड यांच्या उपस्थितीत करण्यात आली. दारु गाळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही जप्त केले आहे. अज्ञात दारु विकेत्यांविरूद्ध तळेगांव पोलीसात दारूबंदीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस उप निरिक्षक प्रदीप राठोड, नायब पोलीस शिपाई निलेश पेटकर, परवेज खान, सचिन साठे, पोलीस हवालदार आशिष चव्हाण, अमोल मानमोडे, सिध्दार्थ टोकसे, शेख हकिम, रुपेश उगेमुगे आदींनी केली.३ लाख ११ हजार रूपयांचा माल जप्तआर्वी- कवाडी (तांडा) ते गव्हाणखेडी मार्गावर नाकाबंदी करून एका पांढºया रंगाच्या वाहनातून पोलिसांनी गावठी मोह दारू भरलेले दोन ट्युबची वाहतुक करताना अनिल लक्ष्मण राठोड (२८) याला अटक केली. सदर प्रकरणात दारूसह वाहन असा ३ लाख ११ हजार २०० रूपयाचा माल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आर्वी पोलिसांनी ही कारवाई पार पाडली.

टॅग्स :liquor banदारूबंदीrailwayरेल्वे