लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : कोल्ही येथील सय्यद शफात अहमद यांच्या दोन्ही घरांतून अज्ञात चोरट्यांनी ९.८३ लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. कुटुंबीय झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी सय्यद शफात अहमद यांच्या दोन्ही घरातील रमजाननिमित्त घरी आणलेल्या दागिने व रोख रकमेवर हात साफ केला. चोरट्यांनी दाराचा कोंडा तोडून आत प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सोन्याचे कडे, गळ्यातील चार हार, डायमंड हार, अंगठ्या, बिंदीया टिक्का, नेकलेस आणि २१ हजार रुपये असा ९ लाख ८३ हजार रुपयांचा ऐवज पळविला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वानपथक व फिंगर प्रिंट एक्सपर्टसह घटनास्थळ गाठले; पण काहीही हाती लागले नाही. शफात अहमद यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार पी.व्ही. मुंडे, पीएसआय अजय अवचट, उमेश हरणखेडे, अजय घुसे, राजेश्याम घुगे, गजानन दरणे करीत आहे. घटनास्थळाला गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे व त्यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली.
९.८३ लाखांचा ऐवज लंपास
By admin | Updated: June 23, 2017 01:30 IST