शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास रे पठ्ठे ! वर्ध्यात शाळकरी मुलाच्या प्रसंगावधानाने वाचले दोन कुटुंबांचे प्राण; भीषण जिवीतहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 10:13 IST

ट्यूशन क्लासला जायचे म्हणून निघालेल्या तेजसला एका घरातून धूर व आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे दिसताच त्याने प्रसंगावधान राखून तात्काळ त्या घरातील सदस्यांना जागे केले व गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. ही घटना गुरुवारी पहाटे ३.३० च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देपहाटे क्लासला जाताना दिसला घरातून निघताना धूरघरात ठेवलेला कापूस व सागवान जळाले

आॅनलाईन लोकमतवर्धा: ट्यूशन क्लासला जायचे म्हणून निघालेल्या तेजसला एका घरातून धूर व आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे दिसताच त्याने प्रसंगावधान राखून तात्काळ त्या घरातील सदस्यांना जागे केले व गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. ही घटना गुरुवारी पहाटे ३.३० च्या सुमारास पवनार येथे घडली.ली.पवनार शहरात राहणाऱ्या हेमराज हिवरे व दौलत हिवरे हे दोन भाऊ शेजारीशेजारी राहतात. त्यांच्या घरातून निघत असलेला धूर व आगीच्या ज्वाळा पाहून त्यांच्या घरासमोरून पहाटेच ट्यूशन क्लासला निघालेला १५ वर्षांचा दहाव्या वर्गात शिकणारा तेजस मुकुंद करमरकर हा मुलगा क्षणभरासाठी स्तब्धच झाला. त्याने न घाबरता सर्वात प्रथम घराचे दार ठोठावून घरच्यांना जागे केले व बाहेर काढले. तोपर्यंत आगीने दोन्ही घरांना विळखा घातला होता. घरच्या मंडळींनी तात्काळ जवळपास मदतीसाठी धाव घेतली. गावकऱ्यांनीही तात्काळ जमेल ते साधन घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला. फायर ब्रिगेडची गाडी येईपर्यंत त्या परिसरातील युवा शक्तीनेच अर्धी अधिक आग विझवली होती.या भीषण आगीत घरात ठेवलेल्या सुमारे ७० क्विंटल कापसापैकी बराचसा कापूस, सागवानाचे फाटे व घरातील सामान जळून खाक झाले. आग कशाने लागली याचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र एका सजग मुलाच्या प्रसंगावधानाने काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा अनुभव हिवरे कुटुंबियांनी घेतला. 

टॅग्स :Accidentअपघातfireआग