शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सतर्कतेचे गिरवून धडे, सायबर चोरांच्या राहा पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:00 IST

सायबर गुन्हेगारांद्वारा फसवणूक केली जात असताना सायबर गुन्ह्यांमध्ये गोल्डन अवरचे महत्त्व सांगण्यात आले आहे. त्यासाठी सर्वप्रथम सायबर सेलशी संपर्क करा, स्क्रीनशॉट व्हॉट्सॲप करा, नंतर एफआयआरची औपचारिकता पूर्ण करा, लँडलाईन नंबर ईमेलद्वारा तक्रारीची स्थिती जाणा, असे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे. गुन्हा घडल्यानंतर लगेच पोलिसांशी संपर्क साधल्यास अशा गुन्ह्यात पैसे मिळण्याचा रिकव्हरी रेट ३५ टक्के असतो.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाढत्या डिजिटल व्यवहाराबरोबरच सायबर गुन्हेगार चांगलेच सक्रिय झाले आहेत. त्यामुळे ही सायबर गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात टि्वटर, फेसबुक, व्हॉट्सॲप या सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना सजग करण्याचे काम वर्धा पोलिसांनी हाती घेतले आहे. ‘जागरुकता आणि सतर्कतेचे गिरवून धडे, राहा सायबर गुन्हेगारांच्या पुढे’ असे आवाहन पोलिसांकडून शहरातील मुख्य चौकाचौकांत केले जात आहे. फसवणूक झालेली रक्कम परत करण्यासाठी गोल्डन अवर महत्त्वाचा ठरतो. सायबर गुन्हेगारांद्वारा फसवणूक केली जात असताना सायबर गुन्ह्यांमध्ये गोल्डन अवरचे महत्त्व सांगण्यात आले आहे. त्यासाठी सर्वप्रथम सायबर सेलशी संपर्क करा, स्क्रीनशॉट व्हॉट्सॲप करा, नंतर एफआयआरची औपचारिकता पूर्ण करा, लँडलाईन नंबर ईमेलद्वारा तक्रारीची स्थिती जाणा, असे आवाहन सायबर पोलिसांकडून केले जात आहे. गुन्हा घडल्यानंतर लगेच पोलिसांशी संपर्क साधल्यास अशा गुन्ह्यात पैसे मिळण्याचा रिकव्हरी रेट ३५ टक्के असतो. तक्रार द्यायला उशीर झाल्यास त्याचे प्रमाण केवळ १० टक्के असल्याचे सायबर पोलीस सांगतात. सायबर पोलिसांकडे मागील वर्षभरात विविध माध्यमातून फसवणुकीच्या तब्बल ४६ तक्रारी दाखल झाल्या आहेत हे विशेष. सायबर पोलिसांकडून मुख्य बाजारात, आर्वी नाका, बजाज चाैक, रामनगर आदी वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांमध्ये जनजागृती करीत असल्याचे दिसते.

सायबर पोलिसांचा जनजागृतीपर संदेश-  तुमच्या बँक खात्यात पैसे टाकले आहेत, अशा लिंकला क्लिक करु नका.-  फेसबुक बनलंय प्रत्येकाच्या गळ्यातील टाईत, फेक अकाउंटचा बळी जाल मित्र जोडण्याच्या घाईत. -  खासगी गोष्टी सोशल करु नका, सेक्सटॉर्शनच्या हनी ट्रॅपमध्ये अडकू नका. 

सायबर गुन्हेगारीचे प्रमाण -  सायबर गुन्हेगारी ऑनलाईन बँकिंग, कार्ड फ्रॉडचे प्रमाण ३५ टक्के, सोशल नेटवर्किंग संबंधित २० टक्के, ऑनलाईन बिझनेस २२ टक्के, हॅकिंगसंबंधित ३ टक्के, तर मोबाईल संबंधित तसेच इतर गुन्हे ४ टक्के आहे. 

काय आहे गोल्डन अवर...गोल्डन अवर म्हणजे असा कार्यकाळ असतो, ज्यात गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता अधिक असते. सायबर पोलिसांकडे तक्रार गेल्यानंतर स्टॉप पेमेंट सूचना विविध पेमेंट करणाऱ्या कंपनीच्या पॅन इंडिया नोडल अधिकाऱ्यांना ताबडतोब पाठवली जाते. तुमची तक्रार पोलिसांच्या करण्यात आलेल्या हॅकिंग, डाटा चोरी, ऑनलाईन उद्योग, फसवणूक, सोशल नेटवर्क, एटीएम कार्ड या पाच युनिटपैकी एकाकडे पाठविली जाते.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस