शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती-स्तनदा मातांकरिता आलेल्या शि-यात अळ्या अन् सोंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 16:44 IST

गर्भवती आणि स्तनदा मातांकरिता शासनाच्यावतीने पोषण आहार म्हणून शिरा पुरविण्यात येतो. सुदृढ आरोग्याकरिता असलेल्या या शि-यात अळ्या अन् सोंडे निघाल्याने खळबळ माजली आहे.

वर्धा,  दि. 21 - गर्भवती आणि स्तनदा मातांकरिता शासनाच्यावतीने पोषण आहार म्हणून शिरा पुरविण्यात येतो. सुदृढ आरोग्याकरिता असलेल्या या शि-यात अळ्या अन् सोंडे निघाल्याने खळबळ माजली आहे. पिपरी (मेघे) येथील अंगणवाडीतून दिलेले पाकिट एका गर्भवती महिलेने सोमवारी घरी उघडले असता हा प्रकार समोर आला. अळ्या आणि सोंडेयुक्त पोषण आहारातून महिलांचे आरोग्य सुधारले जाईल अथवा त्यांचे आरोग्य खालावेल याचा विचार होणे गरजेचे आहे. 

वर्धा शहरालगतच्या पिपरी (मेघे) भागातील अंगणवाडी केंद्रातून येथील एका गर्भवती महिलेला शिºयाचे पाकिट देण्यात आले. हे हवाबंद पाकिट उघडताच यातून रव्यासह अळ्या आणि सोंडे निघाल्याने मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे देण्यात आलेल्या शिºयाच्या पाकिटावर पॅकींग तारीख म्हणून जुलै २०१७ असे उल्लेखित आहे. सोबतच पॅकींग तारखेनंतर चार महिने हे उत्पादन खाण्यायोग्य असल्याचे म्हटले आहे. असे असताना आॅगस्ट महिन्यातच त्यातून अळ्या अन् सोंडे निघाल्याने शासनाच्या योजनेवर प्रश्न निर्माण झाला आहे. 

महाराष्ट्रात शासनाच्यावतीने महिला व बालविकास विभाग आयुक्तालयाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनदामाता यांच्यासाठी पोषण आहार योजना राबविण्यात येत आहे. यावर शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे.

याच निधीतून राज्यातील ग्रामीण आणि शहरी अंगणवाडीत पोषण आहार म्हणून शिरा, उपमा, सुकडी आदी पदार्थ हवाबंद पॅकेटमधून पुरविण्यात येत आहे. यात मोठ्या प्रमाणात अनागोंदी झाल्याचे यापूर्वीही उघड झाले आहे. यामुळे गर्भवती व स्तनदा मातांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा आहार महत्त्वाचा असल्याने त्याबाबत शासनाने गंभीर असने गरजेचे आहे.

 पोषण आहाराचा पुरवठा शासनस्तरावरून होतो. या संदर्भात महिलेने एकात्मिक बाल विकास प्रकल्प संचालकांकडे तक्रार करावी. या संदर्भात पाकिटाचे नमुने घेवून चौकशी करण्यात येईल. - विवेक इलमे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, तथा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी (प्रभारी), जि.प. वर्धा.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPankaja Mundeपंकजा मुंडे