शेतकऱ्यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनसेलू : रबी हंगामाचा प्रारंभ झाला. अनेक शेतात गहु व चण्याची पेरणी सुरू आहे. सध्या पाऊस नसल्याने पेरणी करण्यासाठी बोरधरणाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना भाजपच्या सेलू तालुका कार्यकारिणीच्या वतीने देण्यात आले.पिकांना ओलित करण्यासाठी परिसरतील शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. पाटबंधारे विभागाला ओलितासाठी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात यावे. त्यामुळे उत्पन्नात भर पडेल, असा उल्लेख निवेदनात आहे. यावेळी हरिभाऊ विचोरे व पदाधिकारी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
शेतीकरिता बोरधरणाचे पाणी सोडा
By admin | Updated: November 17, 2016 00:55 IST