शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इंझापूर शिवारातील जमीन पोखरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST

कंपनीने परिसरातील टेकड्या व शेतकऱ्यांच्या जमिनीला पोखरायला सुरुवात केली आहे. काही शेतकरीही चार पैसे मिळावे याकरिता कंपनीला मुरमासाठी शेती देत आहे. बोरगाव (मेघे) परिसरात वर्धा नगरपालिकेचा कचरा डेपो आहे. त्याच्या मागील बाजूस इंझापूर शिवारात एक ले-आऊट असून तेथून टॉवर लाईनही गेली आहे. विशेषत: परिसरातील असंख्य शेतकऱ्यांना जाण्याचा तेथून मार्गही आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची वाढली अडचण : पावसाळ्यात ठरणार धोकादायक, महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : जिल्ह्यात रस्ता रुंदीकरण व सिमेंटीकरणाची कामे सुरू असल्याने या मार्गांसाठी मुरमाचीही मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे कंत्राटदार कंपनीकडून परिसरातील टेकड्या व शेती पोखरायला सुरुवात केली आहे. असाच काहीसा प्रकार मागील काही दिवंसापासून बोरगाव (मेघे) लगतच्या इंझापूर शिवारात सुरू आहे. नियम धाब्यावर बसवून उत्खनन चालविल्याने परिसरातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.वायगाव (निपाणी) ते बोरगाव (मेघे) या मार्गाचे सिमेंटीकरणाचे काम सुरु आहे. या मार्गाची उंची वाढविण्यात आली असून याकरिता मुरमाची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे कंपनीने परिसरातील टेकड्या व शेतकऱ्यांच्या जमिनीला पोखरायला सुरुवात केली आहे. काही शेतकरीही चार पैसे मिळावे याकरिता कंपनीला मुरमासाठी शेती देत आहे. बोरगाव (मेघे) परिसरात वर्धा नगरपालिकेचा कचरा डेपो आहे. त्याच्या मागील बाजूस इंझापूर शिवारात एक ले-आऊट असून तेथून टॉवर लाईनही गेली आहे. विशेषत: परिसरातील असंख्य शेतकऱ्यांना जाण्याचा तेथून मार्गही आहे. टॉवर लाईन, रस्ता किंवा ले-आऊट असेल अशा परिसरात गौणखनिज उत्खननाकरिता परवानगी मिळत नाही. शासनाचा तसा नियम आहे. असे असतानाही शेतकऱ्यांने शेततळ्याच्या नावावर मुरूम काढण्यासाठी शेत कंपनीला दिल्याची माहिती आहे. कंपनीनेही सर्व नियम धाब्यावर बसवून शेत पोखरायला सुरुवात केली आहे. जवळपास एकरभर मोठा खड्डा तयार केला असून आता शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच तेथील टॉवरपर्यंत खोदकाम करण्यात आल्याने भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात या खड्डयात पाणी साचून हा खड्डा परिसरातील शेतकऱ्यांसह शेतकऱ्यांच्या जनावरांसाठीही धोकादायक ठरणार असल्याची ओरड होत आहे.कालावधीनंतरही खोदकाम सुरूचइंझापूर येथील या शेतातून कंत्राटदार कंपनीला ३ हजार ब्रास मुरूम उत्खनन करण्याची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली होती. या कालावधीतच कंपनीने क्षमतेपेक्षा जास्त उत्खनन केले. त्यामुळे काहींनी याप्रकरणी तहसीलदारांकडे तक्रारीही केल्या होत्या. तक्रारीअंती काही काळापर्यंत खोदकाम थांबविण्यात आले होते. येथील उत्खननाची परवानगी ११ जानेवारी २०२० रोजी संपली असतानाही पुन्हा उत्खनन सुरूच आहे. असे असताना तक्रारकर्तेही आता गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देत कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.मुरूम चोरट्यांकडून टेकडीही गिळंकृतइंझापूर परिसरात कंपनीने उत्खनन केलेल्या शेताच्या वरच्या बाजूस टेकडी आहे. ही टेकडीही पोखरल्याचे दिसून आले. राजकीय वरदहस्त असलेल्या काही व्यक्तींकडूनच या टेकडीचा मुरूम चोरला जात असल्याचे सांगण्यात आले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पहाटेपर्यंत येथून ट्रॅक्टरच्या सहाय्याने मुरुमाची चोरी होत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असून मुरुम चोरटे रग्गड होत आहे. त्यामुळे महसूल विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी