शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लालपरीचा प्रवास असुरक्षित; अग्निशमन यंत्र दिसेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील सर्वाधिक नागरिक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करतात. त्यामुळे ‘लोकमत’ ने महामंडळाच्या बसेसमध्ये अग्निशमन यंत्राची सुविधा आहे की नाही, याबाबत आर्वी बसस्थानकावर आलेल्या प्रत्येक बसची पाहणी केली असता बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अग्निशमन यंत्र बसविण्याकडे महामंडळाचेही दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी लालपरीत आगीच्या धगेवर प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देवाय-फाय सुविधा गुंडाळली : आठवड्यात सहा धावत्या वाहनांनी घेतला पेट, चांगली सेवा देण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच

राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असे ब्रीद घेऊन शहरापासून गावखेड्यापर्यंत धावणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरी खऱ्या अर्थाने लोकवाहिनी ठरली. मात्र, खिळखिळ्या झालेल्या बसेस, सोयी-सुविधांचा अभावामुळे आता लालपरीतील प्रवास असुरक्षित ठरु लागला आहे. महामंडळाच्या बसेसमध्ये असलेली अग्निशमन यंत्रेही बेपत्ता झाली असून याकडे महामंडळाचेही दुर्लक्ष असल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे चित्र आर्वी बसस्थानकावर उभ्या असलेल्या बसमध्ये पाहणी केल्यानंतर दिसून आले आहे.जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात विविध प्रकारच्या सहा धावत्या वाहनांनी अचानक पेट घेतल्याच्या घटना घडल्यात. आता काही दिवसांनी उन्हाळा सुरु होणार असून वर्ध्यातील पारा ३२ अंशापार जात असल्याने आगीच्या घटनेत वाढ होतात. जिल्ह्यातील सर्वाधिक नागरिक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करतात. त्यामुळे ‘लोकमत’ ने महामंडळाच्या बसेसमध्ये अग्निशमन यंत्राची सुविधा आहे की नाही, याबाबत आर्वी बसस्थानकावर आलेल्या प्रत्येक बसची पाहणी केली असता बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अग्निशमन यंत्र बसविण्याकडे महामंडळाचेही दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी लालपरीत आगीच्या धगेवर प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून अग्निशमन यंत्र बसविण्याची गरज आहे. 

प्रथमोपचार पेट्या बेपत्तालालपरीमध्ये प्रवास करीत असताना कुठे काही अपघात झाला तर प्रवाशांसह चालक-वाहकांवर प्रथमोपचार करण्यासाठी चालकाच्या कॅबिनमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. त्या पेट्याही एसटी बसमधून बेपत्ता झाल्या आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बसमध्ये प्रथमोपचार पेट्या नसल्याने प्रवाशांसह चालक-वाहकांचीही सुरक्षा ऐरणी आली आहे. एकंदरीत एसटी बसबाबत असलेल्या ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ या ब्रीद वाक्यातील ‘सुरक्षित’ हा शब्दच हद्दपार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मनोरंजनाचे साधनही हिरावलेअ‍ॅड्रॉईड मोबाईलच्या युगात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मनोरंजन व्हावे. याकरिता प्रत्येक बसेसमध्ये वाय-फाय यंत्रणा बसविण्यात आली होती. याचा कंत्राट एका खासगी कंपनीकडे होता. परंतु, वर्षभरातच यंत्रणेचा बोजवारा उडाला. बसेसमधील ही सुविधा बंद झाली असून काही बसेसमध्ये केवळ बॉक्स पहायला मिळत आहे. त्यामुळे मनोरंजनाकरिता असलेले साधन अल्पावधीतच हिरावल्याने प्रवाश्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

आर्वी आगारातून नियमित ४४ बसेस धावतात. या बसेसच्या एकूण २४२ फेऱ्या होत असून दररोज १७ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास करतात. यातून एका दिवसाला साडेचार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळते. सुरक्षिततेच्या दृष्टीने आर्वी आगाराच्या अनेक बसेसमध्ये अग्निशमन यंत्र आहेत. परंतु वाय-फाय सुविधा संबंधित कंपनीने बंद केल्याचे दिसून येत आहे.- नीलिमा हजारे, बसस्थानक प्रमुख, आर्वी.

 

टॅग्स :state transportएसटी