शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन
3
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
4
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
5
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
6
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
7
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
8
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
9
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
10
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
11
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
12
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
13
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
14
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
15
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
16
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
17
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
18
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
19
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
20
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनो, तुमचे गळालेले केस द्या, बदल्यात चक्क सोने न्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 17:46 IST

Wardha News लहानपणी केसाच्या गुंतवळीवर फुगे किंवा तत्सम बारीकसारीक वस्तू मिळायच्या. त्याची वेगळी अपूर्वाई होती. आता याच गळालेल्या एक किलो केसांवर महिलांना तब्बल एक ग्रॅम सोने मिळत आहे.

ठळक मुद्दे केस खरेदीमध्ये आता जुने कपडे खरेदीदार उतरले आहेत. त्यांनी रोख रकमेऐवजी स्टील, जर्मनची भांडी आणि प्लास्टिकच्या वस्तू देणे सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लहानपणी केसाच्या गुंतवळीवर फुगे किंवा तत्सम बारीकसारीक वस्तू मिळायच्या. त्याची वेगळी अपूर्वाई होती. आता याच गळालेल्या एक किलो केसांवर महिलांना तब्बल एक ग्रॅम सोने मिळत आहे. यामुळे केस सांभाळून ठेवण्यावर व ते विकण्यावर महिलावर्गाकडून विशेष भर दिला जात आहे. (Ladies, give your hair back, bring gold in return )५० ग्रॅम केसांना २०० रुपयांहून अधिक भाव मिळत आहे. त्यामुळे महिलांनी केस विंचरताना गळलेल्या केसांचा पुंजका फेकणे बंद केले आहे. आता प्रत्येक पुंजका तन्मयतेने साठवून ठेवला जात आहे. पूर्वी गल्लोगल्ली केसांवर फुग्यांची खरेदी केली जायची. मग फुग्यांची जागा भांड्यांनी घेतली. आता मात्र केस वजनाने खरेदी केले जात आहेत.दीड वर्षांपूर्वी २ हजार रुपये किलोने विकले जाणारे केस सध्या दुप्पट भावाने खरेदी केले जात आहेत. केसांना कमी - अधिक ४ हजार रुपये भाव मिळत असल्याने महिला केस सांभाळून ठेवत आहेत. विदेशात भारतीय केसांना मोठी मागणी आहे. त्यापासून केसांचे विग, हेअर पिसेस बनविली जातात. व्याधीग्रस्त महिलांच्या डोक्यावरील केस निघून जातात. त्यांना हेच विग वापरावे लागतात.मागील वर्षभरात लॉकडाऊनमुळे केस खरेदीवर मोठा परिणाम झाला होता. आता या व्यवसायात तेजी आली आहे. ग्रामीण व शहरी भागात किरकोळ विक्रेते केस खरेदी करतात. सोबत पिशवी व अमूल्य वस्तू मोजण्यासाठी छोटा तराजू असतो. दर महिन्याला ग्रामीण भागात १ ते २ किलो केस जमा होतात. मोठे व्यापारी गल्लोगल्ली फिरुन भांड्यांवर केस विकणा?्यांकडून केस जमा करतात. काळ्या निरोगी केसांना जास्त भाव मिळतो. या विक्रेत्यांकडे काळे, लाल, सोनेरी, सरळ, कुरळे केस असेही प्रकार असतात. भारतातून युरोप, आफ्रिका या देशात केसांची निर्यात होते.

 

टॅग्स :GoldसोनंJara hatkeजरा हटके