शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या तोंडावर केवायसीअभावी सिलिंडरचा खोडा; ई-केवायसी करणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 17:24 IST

Wardha : आता ओटीपी नंबर सांगितल्यावरच मिळतो सिलिंडर

लोकमत न्यूज नेटवर्क सेलू: सिलिंडरची नोंदणी करताना पूर्वी ई-केवायसीची गरज नव्हती. मात्र, आता सिलिंडरची नोंदणी केल्यावर ज्यांनी ई- केवायसी केली त्यांना नोंदणीनंतर त्यांच्या रजिस्टर मोबाइलवर ओटीपी येतो. ओटीपी आल्यावर त्यांना घरपोच सिलिंडर मिळतो. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर सिलिंडरअभावी वंचित राहण्याची वेळ आली आहे.

यापूर्वी मोबाइलवरून गॅस सिलिंडरची नोंदणी केली की, त्वरितच दुसऱ्या दिवशी दारात सिलिंडर घेऊन गाडी यायची. आता मात्र गॅस सिलिंडर एजन्सीमध्ये जाऊन ई-केवायसी करावी लागते, अशा सूचना यापूर्वीच गॅस एजन्सीधारकांनी सर्व ग्राहकांना दिल्या होत्या. मात्र, अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले. आता ई-केवायसी केल्याशिवाय सिलिंडरचे बुकिंग होत नाही. त्यामुळे गॅस एजन्सीधारक गॅसधारकाच्या पुस्तकाचा नंबर आधारकार्ड, मोबाइल नंबर व डोळ्याचे स्कॅनिंग करून नोंदणी करतात. त्यानंतरच गॅस सिलिंडरसाठी नंबर लावता येतो व हे करण्यासाठी केवळ पाच मिनिटांचा अवधी लागतो. मात्र, सहजपणे मोबाइलवर बुकिंग होत असल्याने गॅस सिलिंडर प्रत्येकाच्या घरी पोहोचत होते. त्यामुळे अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले. 

आता दिवाळीच्या तोंडावर सिलिंडरचे बुकिंग होत नसल्याने गॅस एजन्सीमध्ये जाऊन ग्राहक ई-केवायसी करत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर ई-केवायसी झाली नाही तर सिलिंडर मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याने अनेकांची दिवाळीच्या तोंडावर या कामासाठी धावपळ सुरू झाली आहे. तर काहींनी सपरनाचा आधार घेतला आहे.

महिला कार्डधारकांना तीन सिलिंडरची रक्कम ज्या महिलेचे नाव उज्ज्वला योजनेत आहे त्यांना शासनाने वर्षाचे तीन सिलिंडर मोफत केले होते. त्यानंतर ज्या महिलेच्या नावावर सिलिंडर बुकात नोंद आहे. त्याही महिलांना तीन सिलिंडरची रक्कम मिळत आहे. यासाठी अनेक पुरुष आपल्या नावावरील गॅस कनेक्शन घरच्या महिलेच्या नावावर करण्यासाठी प्रयत्न करत असले, तरी सध्या ही प्रक्रिया गॅस एजन्सीधारकांकडून बंद आहे. ती दिवाळीनंतर सुरू होणार असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :wardha-acवर्धा