शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील मजुरांचा लोंढा वर्ध्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 13:16 IST

यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात बसल्याने शेतमजुरांचा रोजगारही हिरावला आहे. त्यामुळे तेथील मजुरांनी पोटाची खळगी भरण्याकरिता आता आपला मोर्चा वर्धा जिल्ह्याकडे वळविला आहे.

ठळक मुद्देरोजगाराच्या शोधात स्थलांतरणशेकडो परिवार कापूस वेचणीच्या कामात व्यस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात बसल्याने शेतमजुरांचा रोजगारही हिरावला आहे. त्यामुळे तेथील मजुरांनी पोटाची खळगी भरण्याकरिता आता आपला मोर्चा वर्धा जिल्ह्याकडे वळविला आहे. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शंभरावर परिवार दाखल झाले असून कापूस वेचणीच्या कामात व्यस्त असल्याने मजुरांचा प्रश्न आता सुटला आहे.खरीप हंगामात पावसाचे उशिरा आगमन झाले. त्यातच परतीच्या पावसानेही दणका दिल्यामुळे कपाशीचे बोंड फुटायला उशीर लागला. आता सर्वत्रच कापूस वेचणीला सुरुवात झाली असल्याने गावांमध्ये मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे गावातील मजुरांचेही दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात आणखीच भर पडली आहे. अशातच हाताला काम नसलेल्या पश्चिम विदर्भातील वाशीम जिल्ह्यासह इतरही भागातील मजूर कुटुंबीय जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या टोळ्या गावातच मिळेल त्यांच्याकडे आसरा घेऊन राहात असल्याने शेतकऱ्यांना मजुरांचा प्रश्न मिटला असून कापूस वेचणीला जोर आला आहे. आता बाहेर जिल्ह्यातून आलेले मजूर सकाळपासूनच कामाला लागत असून त्यांना १४० रुपये मनकी (दहा किलो) मजुरी दिली जात असल्याने गावातील मजुरांचे दरही आवाक्यात आले आहेत. या मजुरांमुळे शेतकऱ्यांची अडचण बऱ्या प्रमाणात सुटली असून आता हे मजूर उलंगवाडी होईपर्यंत इकडेच वास्तव्यास राहणार आहे.

शेतकरीच करतात राहण्याची व्यवस्थाविदर्भाच पांढर सोनं असलेल्या कापसाने यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थिक बजेटच बिघडविले आहे. यावर्षी पºहाटी पाच ते सहा फूट उंच वाढली असली तरी बोंडं मात्र वीसच्या आतच दिसून येत आहेत. त्यामुळे एक-दोन वेच्यातच उलंगवाडी होण्याची चिन्हे आहेत.यामुळे उत्पादनातही कमालीची घट झाली असताना मजुरांच्या कमतरतेमुळे वाढीव दर देण्याचा भारही शेतकऱ्यांवर पडला आहे. रोजगाराच्या शोधात जिल्ह्याबाहेरील मजूर दाखल झाल्याने शेतकऱ्यांचा हा भार बऱ्याप्रमाणात कमी झाला आहे.बाहेरगावावरून आलेल्या मजुरांची राहण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनीच केली आहे. काही मजुरांनी गावात पाल टाकून आसरा घेतला आहे. हे सर्व मजूर सकाळपासून कामाला लागत असल्याने एका दिवसात जास्त कापूस शेतकऱ्यांच्या घरात येत आहे.

टॅग्स :agricultureशेती