शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना विषाणूमुळे किडनीचे नुकसान; लक्षणांकडे लक्ष द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 05:00 IST

कोरोनामुळे किडनीवर होणारा परिणाम हा  साधारणत: रुग्णाच्या अगोदरच्या फंक्शन्सवर अवलंबून असतो. ज्या रुग्णाला  पूर्वी किडनीविषयी कुठलाही आजार नाही व इतर व्याधी जसे मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयरोग, यकृताचा आजार आदी नसल्यास किडनीवर परिणाम कमी होतो. याउलट ज्यांचे वय अधिक आहे, ज्यांना किडनीचा जुनाट आजार आहे, मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयरोग आदी आजार आहेत आणि ज्यांना गंभीर स्वरूपाचा कोरोना संसर्ग झाला अथवा व्हेंटिलेटरची गरज भासली, त्यांच्या किडनीवर अधिक परिणाम होतो.

ठळक मुद्देतज्ज्ञांचा सल्ला : किडनीचा आजार असलेल्या रुग्णाने घ्यावी काळजी

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत किडनीचे नुकसान अधिक प्रमाणात समोर येत असल्याने किडनीचा आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला नेफ्रोलॉजिस्टनी दिला आहे.कोरोनामुळे किडनीवर होणारा परिणाम हा  साधारणत: रुग्णाच्या अगोदरच्या फंक्शन्सवर अवलंबून असतो. ज्या रुग्णाला  पूर्वी किडनीविषयी कुठलाही आजार नाही व इतर व्याधी जसे मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयरोग, यकृताचा आजार आदी नसल्यास किडनीवर परिणाम कमी होतो. याउलट ज्यांचे वय अधिक आहे, ज्यांना किडनीचा जुनाट आजार आहे, मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयरोग आदी आजार आहेत आणि ज्यांना गंभीर स्वरूपाचा कोरोना संसर्ग झाला अथवा व्हेंटिलेटरची गरज भासली, त्यांच्या किडनीवर अधिक परिणाम होतो. हा परिणाम साधारणत: दोनप्रकारे होतो. पहिला तीव्र स्वरूपाचा किडनीचा आजार (अ‍ॅक्युट किडनी इंज्युरी) होतो. दुसरा  दीर्घकालीन (क्रोनिक किडनी डिसीज) आजार वाढू शकतो. तीव्र स्वरूपाचा किडनीचा आजार साधारणत:  ३० ते ४० टक्के कोरोनाच्या रुग्णांमध्ये पाहायला मिळतो. यातील २५ टक्के रुग्णांना डायलिसीसची गरज भासते. साधारणत: २० ते २५ टक्के  रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. तसेच ज्या कोरोनाबाधित रुग्णांचा सीटीस्कोअर १५ च्यावर वर आहे आणि फुफ्फुसात ५० टक्क्यांवर इन्फेक्शन झालेले आहे, अशा रुग्णांमध्ये किडनीचा आजार पाहायला मिळतो. जिल्ह्यात यंदाही मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाबाधित आणि मृत्यूसंख्या वेगाने वाढलेली पाहायला मिळाली. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ४९ हजार ४३ असून, ४७ हजार ४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३०९ रुग्ण उपचार घेत आहेत, तर मृत्यूसंख्या १३१६ आहे. दुसऱ्या लाटेत बहुतांश रुग्णांच्या किडनीचे नुकसानीची बाब पुढे आली. त्यामुळे योग्य उपचार करून घ्यावेत. 

किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास... nकिडनीचा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यास  घाबरून न जाता लगेच  किडनीरोगतज्ज्ञांची भेट घेऊन  त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत. nकोरोनाची चाचणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रुग्णालयात गरज असेल तरच दाखल व्हावे. nमास्क, सॅनिटायझर, वारंवार हात स्वच्छ धुणे या कोरोना त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे. जे रुग्ण डायलिसीसवर आहेत, त्यांनी न चुकता नियमित डायलिसीस करावे. तरच मूत्रपिंड विकारावर सहज मात करता येईल.

हे करा

किडनीचा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यास  घाबरून न जाता लगेच  किडनीरोगतज्ज्ञांची भेट घेऊन  त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत.  कोरोनाची चाचणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रुग्णालयात गरज असेल, तरच दाखल व्हावे. मास्क, सॅनिटायझर, वारंवार हात स्वच्छ धुणे या कोरोना त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे. जे रुग्ण डायलिसीसवर आहेत, त्यांनी न चुकता नियमित डायलिसीस करावे. 

हे करू नका

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मूत्रपिंड विकार असलेल्या रुग्णाने कोणत्याही प्रकारची औषधी घेऊ नये. कोरोनाची चाचणी करायला अथवा दाखल व्हायला टाळाटाळ करू नये.  आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा, फास्ट फूड टाळा, सकस आणि समतोल आहार घ्यावा. धूम्रपान आणि मद्यपान प्रकर्षाने टाळा, रक्तदाब आणि मधुमेह असल्यास अधिक काळजी घ्या. ठराविक अंतराने तपासणी नियमित तपासणी करावी.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या