सचिन देवताळे।लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : वृद्ध आई.. सतत आजारी राहणारी पत्नी, दोन चिमुकले मुले आणि हेमंतला शंभर टक्के असलेले अपंगत्व. हेमंतच्या भरवशावरच भरणपोषण. वृद्ध आई व पत्नीचा आजार आणि दोन चिमुकले मुले व वितभर पोटाची खळगी हा संपूर्ण गाडा हेमंत हाकायचा. पत्नी आजारी असली तरी ती हिंमत न हरता सतत हेमंतच्या पाठीशी राहून धीर द्यायची. यात चिमुकल्यांचे लाडदेखील पुरवायची. अशातच नियतीने त्याची क्रूर थट्टा केली. सततच्या आजारपणामुळे त्याच्या पत्नीनेही जगाचा निरोप घेतला. या आघातामुळे हेमंत पुरता खचला. आपबिती सांगताना हेमंत ढसाढसा रडला.रसुलाबाद येथे गरीब कुटुंबात जन्मलेल्या हेमंत शेगोकार (३५) या तरुणाने अपंगत्वावर मात करून स्वाभिमानाने संसार थाटला. संसाराचा गाडा हाकण्याकरीता तीनचाकी सायकलवर पादत्राणे शिवून पत्नी, दोन चिमुकले व वृद्ध आई यांचा उदरनिर्वाह करीत असे. यात त्याला त्याच्या पत्नीची साथ लाभली. परंतु, सततच्या आजारपणाने पत्नीने जगाचा निरोप घेतला. मुले पोरकी झाली.अपंग हेमंत तीन चाकीवर बसू गावोगावी भटकंती करून लोकांची पादत्राणे शिवतो. त्याला राहायला नेटके घर नाही, त्याच्याकडे साधे रेशनकार्डही नाही. शासनाच्या अपंगासाठी अनेक योजना आहेत; परंतु कामचुकार अधिकाऱ्यांच्या धोरणामुळे त्याला कोणत्याच योजनेचा लाभ घेता आला नाही. हा व्यवसाय करताना त्याला कमालीच्या वेदना सहन कराव्या लागतात.सायकल हाताने चालविताना प्रचंड त्रास होतो. बॅटरीवरीवरील सायकल मिळावी यासाठी त्याने शासनदप्तरी, लोकप्रतिनिधींकडे येरझारा केल्या. मात्र, कुणालाही पाझर फुटला नाही.हेमंतला तीनचाकीवर बसण्याकरिता कुणाचा तरी आधार घ्यावा लागतो. कुठे अडचण आल्यास दुसºयाची मदत घ्यावी लागते. आज समाजात असे अनेक हेमंत आहेत. त्यांना जगण्यासाठी केविलवाणी धडपड करावी लागत आहे. शासनाने अपंगांचे पुनर्वसन करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
अपंग हेमंतची जगण्यासाठी केविलवाणी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:01 IST
सततच्या आजारपणामुळे त्याच्या पत्नीनेही जगाचा निरोप घेतला. या आघातामुळे हेमंत पुरता खचला. आपबिती सांगताना हेमंत ढसाढसा रडला. रसुलाबाद येथे गरीब कुटुंबात जन्मलेल्या हेमंत शेगोकार (३५) या तरुणाने अपंगत्वावर मात करून स्वाभिमानाने संसार थाटला.
अपंग हेमंतची जगण्यासाठी केविलवाणी धडपड
ठळक मुद्देपोटाची खळगी भरण्यासाठी शिवतो पादत्राणे : तीन चाकीवरच थाटले दुकान