शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कान्होलीला यशोदाच्या पुराचा वेढा, ४० पैकी १५ कुटुंबांना केले रेस्कू, २५ व्यक्तींची चमू युद्धपातळीवर करतेय बचाव कार्य

By महेश सायखेडे | Updated: August 9, 2022 19:20 IST

Flood in Kanholi: हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाला यशोदा नदीच्या पुराने वेढल्याने या गावाचा संपर्कच तुटला आहे. ही माहिती मिळताच हिंगणघाट तालुका प्रशासन तसेच पोलीस मुख्यालयातील बचाव पथकाच्या २५ व्यक्तींचे सहकार्य घेत बचाव मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.

- महेश सायखेडे वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाला यशोदा नदीच्या पुराने वेढल्याने या गावाचा संपर्कच तुटला आहे. ही माहिती मिळताच हिंगणघाट तालुका प्रशासन तसेच पोलीस मुख्यालयातील बचाव पथकाच्या २५ व्यक्तींचे सहकार्य घेत बचाव मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. रात्री ७ वाजेपर्यंत ४० पैकी १५ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून उर्वरित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू होते. सततच्या पावसामुळे यशोदा नदीच्या पाणी पातळीत कमालीचीच वाढ झाली. इतकेच नव्हे तर नदी ओसंडून वाहत असल्याने कान्होली या गावाचा संपर्कच तुटला आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने थेट बचाव कार्यालाच सुरूवात करण्यात आली आहे. या रेस्कू मोहिमेवर हिंगणघाटचे तहसीलदार सतीश मसाळ यांचे लक्ष असून ते जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले.बॉक्स

५ मुलांसह १६ महिला अन् ३० पुरुष सुरक्षित रेस्कूबचाव मोहीम सध्या युद्धपातळीवर राबविली जात असून रात्री ७ वाजेपर्यंत १५ कुटुंबातील एकूण ५१ व्यक्तींना सुरक्षित रेस्कू करण्यात आले आहे. यात पाच मुलांसह १६ महिला व ३० पुरुषांचा समावेश आहे. एका रबरी बोटच्या जोरावर ही मोहीम राबविली जात असून रेस्कू केलेल्यांना नवीन कान्होली पूनर्वसन येथील ग्रामपंचायत तसेच मंदीराच्या इमारतीत ठेवण्यात आले आहे.

 पुराच्या वेढ्यामुळे २०० व्यक्ती अडकल्याचा अंदाजनदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने सुरक्षित ठिकाणी जावे असा सल्ला तालुका प्रशासनाच्या वतीने कान्होली येथील नागरिकांना देण्यात आला. त्याला प्रतिसाद देत काहींनी वेळीच तालुका प्रशासनाने सुचविलेले सुरक्षित ठिकाण गाठले. पण अवघ्या काही वेळातच पुराने गावाला वेढल्याने सुमारे १५० ते २०० व्यक्ती कान्होलीतच अडकले. याच व्यक्तींना सध्या रेस्कू केले जात असल्याचे हिंगणघाटचे तहसीलदार सतीश मसाळ यांनी सांगितले.

टॅग्स :floodपूरRainपाऊस