शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कडेकोट पोलीस बंदोबस्तात ‘कालिचरण’ महाराजांना आणले सेवाग्राम ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 05:00 IST

कालिचरण महाराजाने महात्मा गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे वर्ध्यातही पडसाद उमटले. वर्ध्यातील काँग्रेस समर्थकांनी कालिचरण महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी १५३, ५०२ (२) भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी रायपूर येथील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कालिचरण महाराजाला ताब्यात घेत वर्ध्यात आणून न्यायालयात हजर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात अभिजित ऊर्फ कालिचरण सराट महाराज यांच्याविरुद्ध  २८ डिसेंबर २०२१ रोजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास रायपूर येथील कारागृहातून महाराजांना ताब्यात घेत अटक करून कडेकोट पोलीस बंदोबस्तात मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास सेवाग्राम पोलीस ठाण्यात आणण्यात आले.कालिचरण महाराजाने महात्मा गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे वर्ध्यातही पडसाद उमटले. वर्ध्यातील काँग्रेस समर्थकांनी कालिचरण महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी १५३, ५०२ (२) भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी रायपूर येथील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कालिचरण महाराजाला ताब्यात घेत वर्ध्यात आणून न्यायालयात हजर केले. पोलिसांनी न्यायालयात कालिचरण याला लवकरच हजर केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. यावेळी काळ्या फिती घालून कार्यकर्त्यांनी न्यायालय परिसरात निषेध नोंदविला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून होते हे विशेष. न्यायालय परिसरात बघ्यांची चांगलीच   गर्दी जमली होती. 

सुरक्षेच्या दृष्टीने केले सकाळीच हजर -    कालिचरण महाराजाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी सकाळी ११ वाजताच्या न्यायालयात नेण्याचे ठरविले. त्यानुसार पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, महेंद्र इंगळेसह अधिकारी पहाटेपासूनच सेवाग्राम पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी हे देखील भ्रमणध्वनीवरून ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्या संपर्कात होते.

पोलीस मेसमधून खाल्ली वरण-पोळी-    कालिचरण महाराजला सेवाग्राम ठाण्यात सकाळी नाश्त्यासाठी विचारण्यात आले असता त्याने नकार दिला. न्यायालातून त्याला पोलीस मुख्यालयात नेण्यात आले. तेथे त्याला मुख्यालयातील मेसमधून जेवण देण्यात आले. जेवणात त्यानेकेवळ वरण आणि पोळी खाल्ल्याची माहिती आहे. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास वर्धा पोलिसांनी पुन्हा त्याला रायपूर येथील कारागृहात सोडून देण्यासाठी घेऊ गेले.

पोलिसांनी घेतले व्हाईस सॅम्पल-    अभिजित ऊर्फ कालिचरण सराग याला सेवाग्राम पोलिसातील शेवटच्या खोलीत पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले होते. तेथे पोलिसांनी त्याची विचारपूस केली. सोबतच पोलिसांनी ‘कालिचरण’चे व्हॉईस सॅम्पल घेत चौकशी केली. असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहे. 

न्यायालय परिसरात बंदोबस्त

-    कालिचरण सराग याला न्यायालयात नेत असताना पोलिसांचा ताफा होता. न्यायालय परिसराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. पोलिसांनी न्यायालयाच्या पहिल्या प्रवेशद्वारामधून जाण्यास प्रवेश निषेध केला होता, हे विशेष. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनीही गर्दी केली होती. 

 

टॅग्स :Policeपोलिस