शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

जिनिंगला आग; दीड हजार क्विंटल कापूस जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 9:55 PM

येथील श्री गजानन शेतमाल प्रक्रिया उद्योग जिनिंगमध्ये आलेल्या वाहनाच्या गरम सायलेंसरमधून उडालेल्या ठिंगणीने आग लागली. सोमवारी सायंकाळी ४ वाजतादरम्यान लागलेल्या या आगीने रौद्ररुप धारण करुन परिसरातील कापसाच्या तीन गंज्या कवेत घेतल्या.

ठळक मुद्दे१ कोटींच्या नुकसानीचा अंदाज : दोन तासानंतर आग आटोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : येथील श्री गजानन शेतमाल प्रक्रिया उद्योग जिनिंगमध्ये आलेल्या वाहनाच्या गरम सायलेंसरमधून उडालेल्या ठिंगणीने आग लागली. सोमवारी सायंकाळी ४ वाजतादरम्यान लागलेल्या या आगीने रौद्ररुप धारण करुन परिसरातील कापसाच्या तीन गंज्या कवेत घेतल्या. तब्बल दोन तासानंतर ही आग आटोक्यात आली असून यात जवळपास १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.वायगाव- देवळी मार्गावर जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत ठक्कर यांच्या मालकीचा श्री गजानन शेतमाल प्रक्रिया उद्योग जिनिंग आहे. सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीकरिता आणत आहे. तसेच उन्हाचाही तडाखा वाढत आहे. सोमवारी दुपारी जिनिंगमध्ये कापूस घेऊन आलेल्या वाहनाच्या सायलेंंसरमधून ठिंगणी उडाल्याने कापसाच्या गंजीला आग लागली. सायंकाळच्या सुमारास वाराही सुटल्याने ही आग चांगलीच भडकली. पाहतापाहता कापसाच्या तीन गंज्या या आगीने घेरल्या. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तब्बल एक तास उशिराने देवळी, वर्धा व हिंगणघाट येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत १ हजार ५०० ते १ हजार ६०० क्विंटल कापूस जळाला असून १ कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज जिनिंग मालक चंद्रकांत ठक्कर यांनी व्यक्त केला. देवळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस, जिनिंगचे कर्मचारी, शेतकरी व गावकऱ्यांनी सहकार्य केले.