शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

जिगरबाज! दिव्यांग युवकाच्या प्रतिभेची ७० लाख वाचकांनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2023 08:00 IST

Wardha News अपघाताने विकलांग झालेल्या युवकाने हार न मानता पुस्तक लिहिणे सुरू केले. आता हे पुस्तक तब्बल १७ देशांमधील ७० लाख वाचकांनी वाचले आहे.

ठळक मुद्दे१७ देशांतील व्यक्तींकडून ऑनलाइन वाचनहार न मानता लिहिले पुस्तक

राजेश सोळंकी

वर्धा : धडधाकट युवकाला एका अपघातात अपंगत्व आले. मणक्याचे तुकडे झाल्याने कंबर, पाठ व पायाला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनीच तुटली. त्यामुळे चालणे तर सोडाच, पण बसताही येईना. त्यामुळे त्याला नैराश्य आले. तरी मनातली जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. या जिद्दीनेच अभ्यासाचे नियोजन करून आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्याने तब्बल १३७ पानांचे पुस्तक इंग्रजीतून लिहून काढले. ते पुस्तक १७ देशांतील ७० लाख युवकांनी वाचले असून, त्याची दखलही घेण्यात आली.

संतोष बबन वाघमारे असे या युवकाचे नाव आहे. तो वाशिम जिल्ह्यातील पासोडा या गावचा मूळ रहिवासी आहे. ११ वर्षांपूर्वी आर्वीला स्थायिक झाल्यानंतर मंगलमूर्ती कॉटेक्स कंपनीत जिनिंग ऑपरेटर म्हणून संतोषने कामाला सुरुवात केली. त्याचे परिश्रम बघून कंपनी मालक अंकित अग्रवाल यांनी त्याला राहायला घर दिले. त्यानंतर भाऊ गणेश व स्वप्नील आणि आई-वडीलही येथेच राहायला आले; परंतु चार वर्षांपूर्वी जिनिंगमध्ये काम करीत असताना संतोष खाली कोसळला. या अपघातात त्याच्या मणक्याचे तुकडे झाल्याने १५ ते २० दिवस तो अतिदक्षता विभागात होता. त्यानंतर ९ महिने डॉ. सविता बोंद्रे यांनी त्याच्यावर अत्यल्प दरात फिजिओथेरपी केली. औषधोपचाराकरिता १६ ते १८ लाख रुपये खर्च आला. त्याकरिताही अंकित अग्रवाल यांनी मदत केली. मात्र, संताेषला कायमस्वरूपी अपंगत्व आल्याने तो विवंचनेत होता. यातून बाहेर पडण्यासाठी त्याने इंग्रजी वाचनास सुरुवात केली. स्वतः इंटरनेटच्या माध्यमातून साहित्य गोळा करून नोंदी घेतल्या. ई-बुक रायटिंग केले आणि ‘सोशल मीडिया मार्केटिंग ऑन माय स्टार्टअप’ या नावाचे १३७ पानांचे पुस्तक तयार केले. ते पुस्तक ॲमेझॉन किंडरच्या माध्यमातून इंडियन ग्लोबल आयकॉन मॅक्झिनला ऑनलाइन पाठविले. ते पुस्तक भारतासह युरोप, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इटली, नेदरलँड, जपान, ब्राझील, कॅनडा, मेक्सिको, अमेरिका, यूएस, यूके आदी १७ देशांतील ७० लाखांपेक्षा अधिक युवक-युवतींनी वाचले. याची दखल घेत संतोषला ‘इंडियन प्राईम आयकॉन अवॉर्ड’ देण्यात आला.

दिव्यांगांनो, खचून न जाता जिद्द ठेवा

जिनिंगमध्ये अपघात झाला आणि माझं ध्येयच हिरावलं. मात्र, माझ्या आई-बाबांनी आणि मालकांनी मला आधार दिला. त्यावरून ई-बुक रायटिंग लॉगिन क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. एक वर्ष अभ्यास करून ‘सोशल मीडिया मार्केटिंग ऑन माय स्टार्टअप’ हे ऑनलाइन बुक लिहिले. १७ देशांतील ७० लाखांच्या वर तरुणाईने याचे वाचन केले. आता इंडियन शेअर मार्केट फॉरेन्सरेंज करन्सी मार्केट यावर अभ्यास सुरू आहे. पैसा कमविणे हा उद्देश नाही तर दिव्यांगांना दिशा देणे हे माझे कार्य आहे.

संतोष वाघमारे, दिव्यांग युवक

 

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके