शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

दाभोळकरांच्या हत्येच्या तपासातील दिरंगाईबाबत ‘जवाब दो’आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST

डॉ. दाभोळकर मॉर्निंग वॉक करीत असताना २० ऑगस्ट २०१३ ला सनातन संस्था व हिंदू जनजागृतीच्या साधकांनी गोळ्या झाडून हत्या केली. सीबीआयच्या अहवालाप्रमाणेच समितीचे मत सुरुवातीपासूनच होते; परंतु तपासयंत्रणांनी त्याकडे कानाडोळा केला. मात्र, तपासाअंती समितीचे भाकित खरे ठरले.

ठळक मुद्देशासनाचा केला निषेध : शेकडोवर कार्यकर्त्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला सहा वर्षे झालीत तरी अद्यापपर्यंत त्यामागील सूत्रधारांना अटक झाली नाही. याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर निषेध कार्यक्रम २० ऑगस्टला राबविण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा जिल्हा व देवळी तालुका शाखेतर्फे संयुक्तरीत्या ‘जवाब दो’ आंदोलनात वर्ध्यातील विविध चौकात धरणे, घोषणा, चळवळीची गाणी म्हणत निषेध व्यक्त करीत वर्धेकरांचे लक्ष वेधण्यात आले.डॉ. दाभोळकर मॉर्निंग वॉक करीत असताना २० ऑगस्ट २०१३ ला सनातन संस्था व हिंदू जनजागृतीच्या साधकांनी गोळ्या झाडून हत्या केली. सीबीआयच्या अहवालाप्रमाणेच समितीचे मत सुरुवातीपासूनच होते; परंतु तपासयंत्रणांनी त्याकडे कानाडोळा केला. मात्र, तपासाअंती समितीचे भाकित खरे ठरले. याच काळात गोळ्या झाडणारे अनेक संशयित तरूण पकडल्या गेले. पण, त्यासाठी उच्च न्यायालयाला तपास यंत्रणेला खडसावे लागले. सहा वर्षे झालीत अजूनपावेतो तपास पूर्ण झाला नाही. उल्लेखित संस्थांची नावे तपासात असतानादेखील अजूनपर्यंत सूत्रधारांना अटक झाली नाही. याचा तीव्र निषेध म्हणून ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले.आर्वी नाका चौकात दाभोळकरांच्या सूत्रधारांना केव्हा पकडणार? महाराष्ट्र शासन जवाब दो’ ‘फुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोळकर, जितेंगे, लढेंगे, विवेकाचा आवाज बुलंद करूया’ अशा घोषणा देत आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर राज्य कार्यकारिणीचे निमंत्रक सदस्य डॉ. सिद्धार्थ बुटले यांनी मार्गदर्शन केले. शिवाजी चौकात राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, सोशालिस्ट चौकात प्रकाश कांबळे यांनी मार्गदर्शन केले. तर बजाज चौकातील समारोपीय कार्यक्रमात ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. सुभाष खंडारे यांनी मार्गदर्शन केले. चळवळीचे गीत विजय पचारे, प्रा. डॉ. माधुरी झाडे, कविता राठोड, सचिन मेश्राम, भरत कोकावार, सुनील ढाले, सारिका डेहनकर यांनी सादर केलीत. यावेळी विश्वंभर वनकर, वसुधा वनकर, प्रा. नूतन माळवी, सुरेश बोरकर, आशीष हलगे उपस्थित होते.