निवेदन न स्वीकारल्याच्या निषेधार्थ आयटकचे जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 11:19 PM2019-08-02T23:19:18+5:302019-08-02T23:19:42+5:30

आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी आयटकच्या नेतृत्वात एकत्र झालेल्या महिलांचे निवेदनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले नसल्याचा आरोप करीत सदर घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी आयटकच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले.

Jail-full agitation for protest against non-acceptance of the statement | निवेदन न स्वीकारल्याच्या निषेधार्थ आयटकचे जेलभरो आंदोलन

निवेदन न स्वीकारल्याच्या निषेधार्थ आयटकचे जेलभरो आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी आयटकच्या नेतृत्वात एकत्र झालेल्या महिलांचे निवेदनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले नसल्याचा आरोप करीत सदर घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी आयटकच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, कंत्राटी नर्सेस, सुरक्षा रक्षक आदी सहभागी झाले होते.
अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व अन्य आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी आले असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी पुढाकार घेऊन आयटकचे नेते दिलीप उटाणे यांच्यासह निवेदनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विश्रामगृह येथे नेले. त्यावेळी मोठ्या संख्येने सदर असंघटीत कामगार निवेदन देण्यासाठी बाहेर बसून असल्याचे सांगण्यात आले; पण नंतर मुख्यमंत्र्यानी सदर महिलांचे निवेदन न स्विकारताच तेथून जाण्याचे पसंत केल्याचा आरोप आंदोलकर्त्यांनी केला आहे. याच घटनेच्या निषेधार्थ संतप्त निवेदनकर्त्यांनी नंतर जेलभरो आंदोलन केले.
सदर आंदोलनाचे नेतृत्त्व आयटकचे राज्य उपाध्यक्ष दिलीप उटाणे, विजया पावडे, मैना उईके, सुजाता भगत, वंदना कोळणकर यांनी केले. आंदोलनात प्रतिभा वाघमारे, अरुणा खैरकार, सिंधू खडसे, ज्ञानेश्वरी डंबारे, माला भगत, संगीता मोरे, अल्का पुरी, शोभा तिवारी, सुनीता टिपले, संगीता रेवडे, भारती मून, मनिषा झाडे, मंगला इंगोले, विनायक नन्नोरे, प्रफुल डुकरे, मयुर महाजन, मीना लोणकर, रमेश बोदरकर, रंजना तांबेकर, अरुणा नागोसे, कुंदा काळबाधे, ज्योती फुलझले, मंजू शेडे, वैशाली नंदरे, ज्योत्स्ना मुजेवार, वंदना झाडे, निर्मला देवतळे, प्रज्ञा ढाले, शबाना खान, निर्मला सातपुडके, वंदना बाचले, सुलभा तिरभाने, मिना ढोके, कविता केळवतकर, ममता देशकर, सुनंदा आखाडे, हिरा बावने, आशा चतूर, प्रमोदनी भगत, रेखा तेलतुबडे, शकुतला शंभरकर, सरला जंगसे, जयश्री भट, अनिता गोडबोले, शोभा सायंकार, गोदावरी राऊत, विजया कौरती, यमुना नगराळे, संगीता टोणपे, गीता पालीवाल, खांडवे वंदना, रुपा पाटील, अर्चना वाघमारे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Jail-full agitation for protest against non-acceptance of the statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.