शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेचा वापर करून हितसंबंध जोपासणे भयंकर

By admin | Updated: December 10, 2014 23:02 IST

रूपेश मुळेची निर्घृण हत्या ही अंधश्रद्धेच्या मानसिकतेतून केलेली अमानुष कृती होती. अंधद्धेचा वापर करून हितसंबंध जोपासणाऱ्यांचे ते षढयंत्र मानवनिर्मित आपत्तीचा भाग आहे.

वर्धा : रूपेश मुळेची निर्घृण हत्या ही अंधश्रद्धेच्या मानसिकतेतून केलेली अमानुष कृती होती. अंधद्धेचा वापर करून हितसंबंध जोपासणाऱ्यांचे ते षढयंत्र मानवनिर्मित आपत्तीचा भाग आहे. तसेच ती दैवी दहशतवादी निष्पती आहे, असे प्रतिपादन महाराष्ट ्रअनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अनुभव शिक्षा केंद्र व महाराष्ट्र युवा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने, अनिष्ट व अघोरी प्रथा विरोधी प्रबोधन परिषद वर्धा येथील मातोश्री सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अतिथी म्हणून प्रा. ज्ञानेश वाकुडकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे भूईबार, अप्पर पोलीस अधीक्षक आर.जी. किल्लेकर, जनवादी महिला संघटनेच्या सरचिटणीस प्रभा घंगारे, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाची राज्य प्रधान सचिव माधव बावगे उपस्थित होते. वर्धा जि.प. चे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. दवले, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेचे सरचिटणीस सुनील पाटनकर, सुधीर भगत अनुभव शिक्षा केंद्राचे समन्वयक नितीन मते महाराष्ट्र अनिसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले, संजय ठाकरे, नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुरेश वरभे व चंद्रपुरचे कार्याध्यक्ष पी.एम. जाधव, शारदा झामरे, प्रा. जनार्दन देवतळे, गुणवंत डकरे, संयुक्त नंदकुमार वानखेडे, बाबाराव किटे, जिजाऊ ब्रिगेडच्या वानखेडे उपस्थित होते प्रास्ताविक राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांनी केले. संचालन प्रा. माधुरी झाडे व प्रकाश कांबळे यांनी केले. आभार सारिका डेहनकर यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)