शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

किराणा दुकान म्हणजे नशापाणी करण्याचे ठिकाण आहे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 05:00 IST

राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन किराणा दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे.  मद्यावरील शुल्काचा दर ३०० टक्क्यांवरून  १५० टक्के केला होता. त्यानुसार दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून दारूचे नवीन दर उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले होते. दुकानात यासाठी एक शोकेस बनवून वाईन विक्री करण्यास सांगितले.

राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी :   आता  किराणा दुकानात वाईन मिळणार असल्याने शौकीनांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. मात्र, याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. किराणा दुकान आणि मॉलमध्ये वाईन विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.      राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन किराणा दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे.  मद्यावरील शुल्काचा दर ३०० टक्क्यांवरून  १५० टक्के केला होता. त्यानुसार दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून दारूचे नवीन दर उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले होते. दुकानात यासाठी एक शोकेस बनवून वाईन विक्री करण्यास सांगितले. महाविकास आघाडी सरकारने किराणा दुकान, मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेताना शेतकऱ्यांचे अर्थकारण बळावेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, किराणा दुकान म्हणजे नशापाण्याचे ठिकाण नव्हे, असा सूर आता उमटू लागला आहे.

बदनामीच जास्त ...- व्हिस्की असो की बियर, वाईन म्हणजे दारु नव्हे का, असा प्रश्न निर्माण झाला असून, किराणा दुकानात साहित्यापेक्षा दारू विक्रीसाठी जास्त प्रसिद्ध होईल. त्यामुळे किराणा दुकानाची बदनामी जास्त होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.

अध्यादेश निघालाच नाही

- किराणा दुकाने आणि मॉल्समध्ये वाईन विक्रीची परवानगी दिली. यासाठी विरोध दर्शविण्यात आला आहे. शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे. मात्र, तूर्त याविषयी महाविकास आघाडी सरकारने ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. दैनंदिन दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. अध्यादेश अद्याप निघाला नसल्याची माहिती आहे.

किराणा दुकानात वाईन विक्री नकोच

किराणा दुकानात  वाईन मिळणार, हे जरी सत्य असले  तरी त्याचे काही नोर्मस आहेत, त्यातच वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे येथे वाईन विक्रीचा प्रश्न उद्भवणार नाही. तशा गाईडलाईन वाचण्यातही आल्या नाहीत. - अनिल  लालवाणी, किराणा व्यावसायिक.

दुकानात वाईन विक्री करावी की, इतर किराणा  साहित्याची विक्री करावी, आता विचार करावा लागेल. मात्र, वाईन विक्री  किराणा दुकानात तरी नकोच. दुकानात सर्व प्रकारचे ग्राहक येतात. त्यामुळे याचा परिणाम लहान मुले, महिलांवर होण्याची शक्यता आहे.- राजेंद्र बावनकर, किराणा व्यावसायिक

 

टॅग्स :liquor banदारूबंदी