शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

अवैध उत्खननास उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:08 IST

परिसरात सध्या ठिकठिकाणी अवैध उत्खनन केले जात असल्याचे दिसून येत आहे. उत्खनन माफिया अवैधपणे मोठाले डोंगर पोखर करीत असल्याने शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. उत्खनन माफियांच्या या मनमर्जी कारभारावर महसूल व वन विभागाच्या अधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून संशय व्यक्त केल्या जात आहे.

ठळक मुद्देमहसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका बघ्याची

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : परिसरात सध्या ठिकठिकाणी अवैध उत्खनन केले जात असल्याचे दिसून येत आहे. उत्खनन माफिया अवैधपणे मोठाले डोंगर पोखर करीत असल्याने शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. उत्खनन माफियांच्या या मनमर्जी कारभारावर महसूल व वन विभागाच्या अधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून संशय व्यक्त केल्या जात आहे.तहसीलदाराच्या अंगावर धाव करण्यापर्यंतची मजल परिसरातील गौण खनिज तस्करांची गेल्याचे गत काही दिवसांपूर्वी येळाकेळी येथे घडलेल्या प्रकारावरून दिसून झाले. शिवाय आकोली भागात गेल्या सहा दिवसांपासून दिवसभर बिनबोभाट मुरुमाचे उत्खनन करून त्याची अवैधपद्धतीने वाहतूक केली जात आहे. याकडे वन विभागाचे अधिकारी व महसूल विभागाच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. ज्या वन व महसूल अधिकाºयांच्या आशिर्वादाने सदर माफिया मोठे झाले तेच आता या अधिकाºयांना वाकुल्या दाखवित आपल्या मनमर्जीप्रमाणे काम करीत आहेत. आकोली शिवारातील टेकडी परिसरातून दररोज सुमारे ५० ट्रॅक्टरची अवैध पद्धतीने मुरुमाची उचल केली जात आहे. इतकेच नव्हे तर तामसवाडा शिवारात हा प्रकार खुलेआम सुरू असल्याचे दिसून येते. यातील काही माफीयांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने प्रशासनाला ही कारवाई करण्यास अडचण येते अशी चर्चा प्रशासकीय वतुर्ळात आहे. त्यामुळे माफीयांची हिंमत वाढली आहे.दररोज ५० ट्रॅक्टर मुरूमाची उचलआकोली, तामसवाडा, रिधोरा या परिसरातून अवैध पद्धतीने उत्खनन करून दररोज सुमारे ५० ट्रॅक्टर मुरुमाची उचल केली जात असल्याचे सुत्रांनी सांगितले. रिधोरा धरणाकडे तामसवाडा गावाकडून जाताना डाव्या बाजूला असलेल्या जंगलात अवैध उत्खनन करून मुरुमाची वाहतूक करण्यासाठी दररोज मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. परंतु, वन व महसूल विभागाचे अधिकारी बघ्याचीच भुमिका घेत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.चेले-चपाटे ठेवतात पाळतगौण खनिज तस्करांनी पोसलेले चेलेचेपाटे कुणी कारवाई करण्यासाठी तर आले नाही ना यासाठी दिवसभर घटनास्थळावरून पाळत ठेवत असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यांच्याकडून तत्काळ माहिती झटपट अवैध उत्खनन करणाºयांपर्यंत व मालवाहू वाहनचालकांपर्यंत पोहोचते, हे विशेष.क्षेत्र सहाय्यक व वनरक्षकाची धु्रतराष्ट्राची भूमिकाक्षेत्र सहाय्यक व वनरक्षक हे दोन्ही प्रामाणिक असल्याचे बोलले जात असले तरी उत्खनन माफीयांकडून लावण्यात आलेला मनमर्जी कामाचा सपाटा त्यांना दिसत नाही काय, असा सवाल निसर्गप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.आपण छापा टाकून होणारी कारवाई यशस्वी व्हावी यासाठी बरेच प्रयत्न केले. शासकीय वाहनातून तर मध्येच खासगी वाहनाचा प्रवास करून घटनास्थळ गाठत असलो तरी उत्खनन माफियांचे खबरी त्यांना बरोबरच माहिती देतात. त्यामुळे कारवाईत अडचणी निर्माण होत आहे. वेळीच उत्खनन माफियांना धडा शिकविल्या जाईल.- एम.ए. सोनोने, तहसीलदार, सेलू.तामसवाडा शिवारात ज्या ठिकाणी अवैध उत्खनन होत आहे तो भाग महसूल विभागाच्या बोरखेडी साझात येतो. आपण त्या स्थळाची मोक्का पाहणी केली आहे. वनविभागाच्या हद्दीत अशा प्रकारचे उत्खनन होत असल्यास नागरिकांनी माहिती द्यावी.- के. एम. वाटकर, क्षेत्र सहाय्यक, झडशी.